दिनांक – १०/१०/२०२५ गणेश पुजारी,गर्जा महाराष्ट्र न्यूज :- वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती अनेक असल्या तरी उल्हासनगरातील विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गरड यांनी आपला वाढदिवस साजरा करण्याचा जो आदर्श ठेवला, तो समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. गरड यांनी आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक आणि सहकाऱ्यांना आवाहन केले की, “माझ्या वाढदिवसानिमित्त शाल, हार, बुके न आणता पूरग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करा.” त्यांच्या या भावनिक आवाहनाला समाजातील अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सामाजिक भावनेतून दशरथ गायकवाड, नितीन सपकाळे, निलेश बोबडे, बंसराज विश्वकर्मा, हरी शिंदे, पिंटू भालेराव, विजय गायकवाड, कृष्णा साळुंखे, सुनील सोनवणे, राजू गायकवाड, पुष्पक फेगडे, अजय वाखरकर, साई ग्राफिक्स, सागर जाधव, आकाश वाघमारे, मनीष वलेचा,…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक – ०१/१०/२०२५ गर्जा महाराष्ट्र न्यूज :- पाचोरा तालुक्यात शहरात, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामध्ये चार चाकी,दोन चाकी वाहन विना नंबर प्लेट शहरात आणि गावात फिरत आहे. यामध्ये टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल अथवा मोठा ट्रक असेल किंवा तीन चाकी तसेच ट्रॅक्टर अशा विविध प्रकारे वाहनांचा समावेश आहे. राजकीय पक्षाचे बॅनर, सिम्बॉल लावून बिंदासपणे लोक वावरत आहे. यामुळे अनेक गुन्हेगारी टोळीला वाव मिळणार आहे. रात्री-अपरात्री संशयित गाड्या पाचोरा शहरात फिरताना आढळून येत आहे. तसेच दिवसा ढवळ्या अनेक वाहन विना नंबर प्लेटचे पाचोरा शहरात मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहे. पाचोरा पोलिसांच्या डोळ्यावर…
दिनांक – ०१/१०/२०२५,गणेश पुजारी,मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचे जीवन वाहिनी अर्थात मुबंई लोकलची अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी येथील प्रवाशांनी अंबरनाथ येथून ०८:४९ मिनीटांनी सुटणारी अंबरनाथ-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणाऱ्या लोकल ट्रेनची सजावट करत दसरा आनंद उत्सव साजरा केला.रेल्वे प्रवाशांसाठी लोकल आणि रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवसांकडे पाहिलं जातं दसऱ्याच्या आदल्या दिवशी अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी रेल्वे प्रवाशांनी उत्साहात दसरा साजरा केला. ग्रुप मधील सर्व प्रवाशांनी स्वइच्छेने वर्गणी काढून रेल्वेतील आपल्या डब्याची रंगीबेरंगी पताका फुगे आणि फुलांची आरास करून प्रवाशांनी लोकलचे डबे सजवले इतकच नाही तर लोकलचे पूजन करून मोटार मन तसंच गार्डचे आभारही व्यक्त…
दिनांक – २३/०९/२०२५, ठाणे प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- रेल्वेत टीसीच्या नोकरीचं आमिष दाखवून २२ लाखांची फसवणूक; सराईत गुन्हेगार योगेश साळोखे ला ०९/०९/२०२५ रोजी गडहिंग्लज येथून अटक. कल्याण पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरू. रेल्वेमध्ये सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योगेश हरी साळोखे (वय ३४, रा. हसूर खुर्द, ता. कागल, जि. कोल्हापूर) याला गडहिंग्लज येथून अटक करण्यात आली असून, सध्या त्याच्यावर कल्याण पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यात एकूण अंदाजे २२ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीने गडहिंग्लज येथे स्वतःच्या व पत्नीच्या नावावर बंगला खरेदी केला असून, चारचाकी व दुचाकी वाहनं तसेच गावात शेती…
दिनांक – १७/०८/२०२५, प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- खरच तालुक्याच्या जनतेच्या भल्यासाठी आहे कि स्वतः च्या स्वार्थासाठी प्रताप हरी,वैशू ताई, दिलीप भाऊ वाघ ह्या लोकांचा भाजप प्रवेश. पाचोरा भडगाव मतदार संघात सध्या भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे कोणालाही प्रवेश नाकारू नका असे राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री आपल्या जिल्ह्याचे माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी नुकतच वक्तव्य केले आहे. पाचोरा आणि भडगाव मध्ये नुकताच तीन लोकांचा राजकीय प्रवेश झाला आहे एक वैशाली ताई सूर्यवंशी तसेच प्रताप हरी पाटील दिलीप भाऊ वाघ व अगोदरपासून भाजप मध्येच असलेले श्री अमोल भाऊ शिंदे विधानसभेचे दावेदार आहेत.पण बघा ह्या चोघांना भाजपने कसं एका फुल माळ्यात वळण्याचे काम केले…
दिनांक – २२/०८/२०२५, मुंबई प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेल व मुंबईचे वरिष्ठ पत्रकार अनिल भाऊ महाजन यांच्या नावाचा काही भामटे गैरवापर करून बनावट नावाने फोन करून सर्वसामान्य नागरिकांना धमक्या देणे व ब्लॅकमेल करण्याचा प्रकार करत आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात स्पष्ट करण्यात येते की, गर्जा महाराष्ट्र न्यूज हे एक नामांकित व नावलौकिक प्राप्त मीडिया हाऊस आहे. आमच्या चॅनेलचा अशा कुठल्याही अवैध व बेकायदेशीर प्रकाराशी संबंध नाही. म्हणून, जर कोणी गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या नावाने किंवा अनिल महाजन बोलतोय अस सांगुन बनावट कॉल करत असेल, तर कृपया तात्काळ आमच्याशी किंवा जवळच्या…
दिनांक – २४/०६/२०२५, मुंबई प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- माळी समाजातील जळगाव जिल्ह्यातील, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय बालक तेजस महाजन हत्या प्रकरणी महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक तात्काळ सखोल चौकशी करून उर्वरित आरोपींना अटक करावी. महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना दिले लेखी पत्र. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव गावातील तेजस महाजन १३ वर्षीय बालक हत्याप्रकरणी महाराष्ट्र माळी समाज महासंघाने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच अन्यायग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी महाराष्ट्र माळी समाज महासंघ एकनिष्ठ पणाने उभे आहे व महासंघाचा जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तसे…
दिनांक – ११/०६/२०२५,मुंबई प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- श्री.संदीप पटनावर भिवंडी पाणीपुरवठा विभाग यांच्या विरुद्ध प्रधान सचिव नगरविकास मंत्रालय यांनी दिले कार्यवाही चे आदेश भिवंडी महानगर पालिका आयुक्त यांना शासनाकडून लेखी आदेश प्राप्त. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव, वरिष्ठ पत्रकार अनिलभाऊ महाजन यांनी नगर विकास प्रधान सचिव तसेच नगर विकास मंत्री यांच्याकडे भिवंडी येथील पाणीपुरवठा विभागात अभियंता श्री.संदीप पटनावर यांची तक्रार दाखल केली होती.सदर तक्रारीच्या अनुषंगाने प्रधान सचिव नगर विकास यांनी श्री.संदीप पटनावर यांची गेल्या दहा वर्षापासून एकच ठिकाणी एकच जागेवर पाणीपुरवठा विभागात नेमणूक कशी नियमानुसार बदली का नाही ? तसेच भिवंडी शहरात आणि पाणी चोरीचे गंभीर गुन्हे घडत आहे.…
दिनांक – ०७/०५/२०२५,मुंबई प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता श्री संदीप पटनावर यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते एकाच पदावर कार्यरत असून, यांच्या कार्यकाळात भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची पाहण्यासाठी दैनंदिन दैना होत आहे नियमानुसार त्यांची बदली न झाल्याने याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव अनिल महाजन यांनी याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रधान सचिव, नगर विकास मंत्रालय, डॉ. के. गोविंद राज नवी 2 मंत्रालय यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रारीत संदीप पटनावर यांच्याविरुद्ध चौकशी समिती…
वरिष्ठ पत्रकार अनिलभाऊ महाजन यांनी पाचोरा-भडगावचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या बदल दिलेले स्पेशल आर्टिकल. पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि साध्या-सर्वसामान्य स्वभावाने जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. मंत्रालयाचे ज्येष्ठ पत्रकार आणि गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक अनिल भाऊ महाजन यांनी आपल्या ताज्या लेखात किशोर आप्पा यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांच्या मते, किशोर आप्पा यांचा साधा स्वभाव, कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक आणि काम करण्याची अनोखी पद्धत हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. सलग तिसऱ्यांदा पाचोरा विधानसभेत निवडून येणारे किशोर आप्पा पाटील यांचे हे यश त्यांच्या प्रामाणिक आणि पारदर्शी…