दिनांक – २१/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यंदा मंत्रिमंडळाच्या यादीत कोणाची वर्णी लागणार याची मोठी उत्सुकता सर्वांनाच होती. अनेकांचा पत्ता कट झाला आणि नाराजीनाट्य देखील रंगताना दिसल. नागपुरात शपथविधी कार्यक्रमानंतर लगेच अधिवेशन असल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त केल्याने महायुतीचे तिन्ही नेते कोंडीत सापडल्याचं चित्र दिसलं. अशात, मागील 4-5 दिवसापासून खातेवाटप रखडल्याने नेमकं खातेवाटप कधी होणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

मंत्री न झालेल्यांची नाराजी आणि अपेक्षित विभाग न मिळाल्याने नाराजी, अशी दुहेरी अडचण एकाच वेळी येण्याऐवजी वादळ शांत करण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांचा दिसतोय. सोबतच, काही खात्यांसंदर्भात अजूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी जोरदार मागणी करताना दिसत आहे, त्यामुळे देखील खातेवाटपास उशिर होताना दिसतोय. अधिवेशन 21 डिसेंबरला संपताच त्याचदिवशी रात्री किंवा 22 डिसेंबरला राजभवनाला पत्र पाठवलं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. पहिले मुख्यमंत्री पद… नंतर मंत्रिमंडळ वाटपासंदर्भातली नाराजी आणि आता खाटेवाटपात संदर्भात घेतला जाणारा वेळ… अशात, सर्व वादळ शांत होतं आणि त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न महायुती सरकारचा दिसतोय.

Share.