दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी, विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बीव्हीए आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. भाजपचे सरचिटणीस तावडे यांच्यावर प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी मतांच्या बदल्यात रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला आहे. राजन नाईक वसई तालुका विधानसभा उमेदवार भाजपा यांचा हॉटेल विवांता विरार येते विनोद तावडे आणि राजेंद्र नाईक यांचे चिरंजीव पैसे वाटप करत असताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलला घेराव घातला. या दरमान्य बीव्हीए आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यांच्या कार्यकर्त्यांमधील गोंधळाचा व्हिडिओ वायरल झाला आहे

Share.