दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  गांधी फिल्म्स फाउंडेशन आणि फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्टच्या वतीने कलाकार व विद्यार्थ्यांसाठी राजभवन मुंबई येथे मंगळवारी (दि. १९) एका चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कार्यशाळेला भेट दिली तसेच विद्यार्थी कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतींचे अवलोकन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला व कलाकार तसेच आयोजकांना कौतुकाची थाप दिली.

या कार्यशाळेत सहभागी कलाकार व विद्यार्थ्यांनी राजभवनातील विविध ऐतिहासिक वास्तू व निसर्गाचे चित्रण केले.

गांधी फिल्म्स फाउंडेशनचे कलाकार व क्युरेटर संजय निकम व ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधाकर ओलवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Share.