दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे काल रात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाल्याची दुःखदायक घटना घडली असून संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री ८:०६ वाजता दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले होते. रात्री ९:५१ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कर्नाटकमधील बेळगाव येथे सुरू असलेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रद्द करण्यात आली आहे. याशिवाय २७ डिसेंबर रोजी होणारे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बेळगावहून दिल्लीला रवाना झाले आहेत.

 

Share.