दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेसीमा भागातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने विरोध केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य यांना अटक करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध करण्यात आले. या कर्नाटक सरकारच्या कृत्याचा महाराष्ट्र शासन तीव्र निषेध करीत आहे. मी देखील मराठी भाषिकांच्या लढ्यात तुरुंगवास भोगला असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती तीच भूमिका आमच्या सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने वकील दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील यापूर्वी या प्रश्नाबाबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन देखील कर्नाटक सरकार अशी भूमिका घेत असेल तर कर्नाटक सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतोअसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

Share.