दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक यांनी महारेराचे अध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज मंत्रालयात श्री. सौनिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, महारेराचे सदस्य महेश पाठक, माजी सदस्य एस. एस. संधू, महारेराचे मावळते अध्यक्ष अजोय मेहता तसेच गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.