दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावाचे ३३ वर्षिय फौजी जवान शेतात वडीलांना मदतीसाठी गेले असतांना शेतातुन परतीचा प्रवास करतांना विजांचा कडकडाट होवुन विज पडल्याने जागेवरच जवानाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली. शहरातील नवीन कॉलेज मागील परिसरातील रहिवासी असलेले तालुक्यातील अंतुर्ली खडकी येथील सुपुत्र भुषण आनंदराव बोरसे (वय-३३) हे नवीन घराची वास्तुशांती करण्यासाठी रजा घेऊन घरी आले होते. दि. ९ रोजी दिवसभर परीवारासह पेडकाई माता या कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन आपल्या गावी आले असते अचानक सायंकाळी पावसाची रीमझीम सुरू झाली तेव्हा हातातील मनगटी घड्याळ आणि मोबाईल विजे पासुन सुरक्षेच्या दृष्टीने घरी ठेवून आपल्या बाईकवर वडीलांना मदतीसाठी शेतात धाव घेतली असता विजेचा कडकडाट होत वडीलांच्या अवघ्या १०० फुटांवर स्व. भुषण बोरसे यांचे दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली आहे. स्व. भुषण बोरसे हे बिहार येथील मोतीहारी ७ टि १बीएन बटालीय मध्ये सशस्त्र सिमा बल मध्ये कार्यरत होते. त्यांना एक मुलगा,पत्नी,आई,वडील असा परीवार आहे. पाचोरा कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन बोरसे परीवाराचे सात्वंन केले. स्व.भुषण बोरसे यांनी नवीन वास्तू बांधली म्हणून तिचे वास्तुशांती कार्यक्रमासाठी रजेवर घरी आले होते. यासाठी काही दिवसांपासून पत्रिका वाटत होते. अशातच या घटनेमुळे सर्वांनाच हळहळ व्यक्त होत आहे. तहसीलदार यांनी तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.
● नेमकी विज पडली कशी?
स्व.भुषण बोरसे जेव्हा वडीलांना शेतात मदतीला गेले तेव्हा त्यांनी विज अंगावर पडु नये म्हणून काळजी म्हणून हातातील मनगटी घड्याळ आणि मोबाईल घरीच काढुन ठेवल्यावर विज पडली कशी तर ते बाईक वर वडीलांच्या बैलगाडी मागे येत असतांना इलेक्ट्रिक तारा आणि शेतातील डीपी याच्या कडे विज आकर्षकीत झाली आणी सरळ स्व. भुषण बोरसे यांच्या उजव्या खांद्यावर स्पर्श करून गेली असल्याची माहिती प्राथमिक स्वरूपात स्थानिकांनी दिली आहे. यातुन भविष्यात शेतकऱ्यांनी काळजी घेतांना इलेक्ट्रिक डीपी आणि विज तारा पासून सावध राहीले पाहीजे असे अवाहन करण्यात आले आहे.

Share.