दिनांक –०५/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- झिप इलेक्ट्रिक या भारतातील आघाडीच्या ईव्ही-अॅज-अ-सर्व्हिस प्लॅटफॉर्मने शाश्वत उत्सर्जन मुक्त वाहतूकीच्या माध्यमातून क्विक कॉमर्स क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीने २०.५ दशलक्षांहून अधिक शून्य-उत्सर्जन डिलिव्हरीज पूर्ण केल्या आहेत आणि पर्यावरणपूरक लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात नवीन मापदंड स्थापन केला आहे. अखेरच्या टप्प्यापर्यंत डिलिव्हरी देण्याच्या क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याप्रती कंपनीची बांधिलकी यातून अधिक दृढ झाली आहे. दिल्ली-एनसीआर (राजधानी परिसर) भागात केल्या जाणाऱ्या एकूण क्विक कॉमर्स डिलिव्हरींपैकी सुमारे १५-२० टक्के झिपमार्फत होतात.
झिप इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक व सीईओ आकाश गुप्ता म्हणाले, “झेप्टो, ब्लिंकइट, बीबी नाऊ आणि स्विगी इन्स्टामार्ट या आमच्या अफलातून क्विक कॉमर्स सहयोगींशी झालेली पहिली भेट मला आठवते, हा विभाग डिलिव्हरी बाजारपेठेत क्रांती घडवून आणेल, याची खात्री आम्हाला वाटत होती. हे यश म्हणजे केवळ एक आकडा नव्हे; क्विक कॉमर्समध्ये शाश्वतता राखण्यासाठी आम्ही करत असलेल्या अविश्रांत प्रयत्नांचे ते प्रतीक आहे. जलद व शाश्वत लॉजिस्टिक्स हेच ई-कॉमर्सचे भवितव्य आहे यावर झिप इलेक्ट्रिकचा विश्वास आहे. वेग आणि शाश्वतता या परस्परविरोधी बाबी आहेत हा गैरसमज आम्ही दूर करू शकतो हे आमच्या सहयोगांनी दाखवून दिले आहे. भविष्यकाळात भारतात इलेक्ट्रिक वाहनांद्वारे डिलिव्हरी हा नियमच करण्याच्या दिशेने चाललेल्या वाटचालीचे नेतृत्व करणे आमच्यासाठी रोमांचक अनुभव आहे आणि २१ दशलक्षवी डिलिव्हरी माझ्या टीमसह करून मी स्वत: या क्षणाचा आनंद लुटणार आहे.”
भारतातील क्विक कॉमर्स बाजारपेठ ही नव्याने सापडलेली सोन्याची खाण आहे, तिचे मूल्य सुमारे ६० ते ७० अब्ज डॉलर्स आहे. हा विभाग किराणा व दैनंदिन अत्यावश्यक वस्तूंच्या अतिवेगवान डिलिव्हरींवर लक्ष केंद्रित करतो आणि त्यात भरीव वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. २०३० सालापर्यंत हे क्षेत्र २५ ते ५५ अब्जांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. झिप इलेक्ट्रिकसारख्या कंपन्या या विभागाच्या वाढीचा कणा आहेत. त्यामुळेच नवीन दर्जेदार डिलिव्हरी पार्टनर्स नियुक्त करणे, व्यवसायांना यासाठी घ्यावा लागणारा त्रास कमी करणे आणि डिलिव्हरी नमुन्यांमध्ये दर्जा व भरवसा आणणे आदी बाबी या कंपन्यांमुळे शक्य होत आहेत. शिवाय, व्यवसायांना कार्बन उत्सर्जन कमीत-कमी राखून शेवटच्या ग्राहकाला माल पोहोचवण्याची क्षमता यातून मिळत आहे.
झेप्टो, ब्लिंकइट, बिग बास्केट नाऊ आणि इन्स्टामार्ट यांसारख्या क्विक कॉमर्स क्षेत्रातील महाकाय कंपन्यांसोबत धोरणात्मक भागीदारी करून झिप इलेक्ट्रिकने कार्बन उत्सर्जनात २.५ दशलक्ष किलो एवढ्या प्रचंड कपातीचे योगदान दिले आहे. झेप्टोसाठी कंपनीने सुमारे १०.४ दशलक्ष डिलिव्हरी केल्या आहेत आणि कार्बन उत्सर्जनात ११.९५ लाख किलोंची कपात केली आहे. ब्लिंकइटचा क्रमांक त्यापाठोपाठच आहे, ब्लिंकइटसाठी कंपनीने ७.१९ दशलक्ष डिलिव्हरी केल्या आहेत आणि कार्बन उत्सर्जन ८.२९ लाख किलोंपर्यंत कमी केले आहे. त्याचप्रमाणे बीबीनाउसाठी केलेल्या डिलिव्हरींची संख्या २.७६ दशलक्ष आहे, त्याची परिणती ४.२२ लाख किलो कार्बन उत्सर्जन कपातीत झाली आहे, तर झिपसोबत नुकतेच काम सुरू करणाऱ्या इन्स्टामार्टसाठी कंपनीने २.१५ लाख डिलिव्हरी केल्या आहेत आणि कार्बन उत्सर्जनात ७२,२५१ किलोंनी घट झाली आहे.