दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- हिंदुस्थानाबद्दल जाज्वल्य राष्ट्रप्रेम असलेल्या पंडित नथुराम गोडसे आणि हुतात्मा नारायण आपटे यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय हिंदुमहासभा यांच्या वतीने दादर येथील पाटील मारूती मंदिर सभागृह येथे आज सायंकाळी सहा वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हिंदुमहासभेचे राष्ट्रीय नेते दिनेश भोगले यांचे `अहिंसा एक भ्रम’ या विषयावरील अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन भाषण आणि विवेचन होणार आहे. महाराष्ट्राचे प्रमुख कार्यवाह महेश पटेल आणि मुंबईचे अध्यक्ष अनुप केणी देखील यावेळी उपस्थित राहतील. अधिकाधिक देशभक्तांनी यावेळी उपस्थित राहून अमरवीर पंडित नथुराम गोडसे आणि हुतात्मा नारायण आपटे यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन हिंदुमहासभेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.