दिनांक – २७/०४/२०२६ भिवंडी /ठाणे ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी शहरात रोज रात्री ०१ ते ०५ दरम्यान येणाऱ्या कोयला भरून येणाऱ्या ओवरलोड ट्रक सप्लाय जोरात सुरू.

कोयला भरून येणाऱ्या ट्रककडे भिवंडी ट्राफिक पोलिसांचे दुर्लक्ष….

दररोज रात्री लाखो रुपयाचा कोयला ओव्हरलोड ट्रक मधून होतोय सप्लाय….

भिवंडी ट्राफिक पोलिसांचा विषय पुन्हा चर्चेला, अनेक नियमबाह्य काम भिवंडी ट्राफिक विभागात सुरू.

(01) भिवंडी शहरात दररोज रात्री व आठवड्याला शेकडो ओव्हरलोड ट्रक कोयला भिवंडी शहरात येत आहेत. यावर ट्राफिक पोलीस कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत.

(02) स्टोन क्रशर कंपनी येथून भुसा भरून अनेक ओवरलोड शेकडो ट्रक भिवंडी शहरात येत आहेत.

(03) भिवंडी शहरात खाच्या रिक्षा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. खाच्या रिक्षा म्हणजे काय ? तर एका परमिटवर दोन रिक्षा सुरू आहेत.एक रिक्षा भिवंडी शहरात चालते तर दुसरी रिक्षा भिवंडी बायपास, कल्याण, कोनगाव, कल्याण रोड या ठिकाणी सुरू असते. या खाच्या रिक्षाची भिवंडी ट्राफिक पोलिसांकडे लिस्ट आहे. खाच्या रिक्षाची नोंदणी आहे. अशा रिक्षा वर कोणती कार्यवाही होत नाही. त्या बिंदासपणे सुरू आहेत. ही लिस्ट कोणाकडे आहे. यावर सविस्तर लवकरच लेखाजोखा मांडण्यात येईल. तसेच स्क्रॅप जाणाऱ्या रिक्षा ज्या ग्रीन टॅक्स भरून सुद्धा रिन्यूअल होऊ शकत नाही. अशा रिक्षा फक्त बॉडी बदलून बिंदासपणे सुरू आहेत. डेड झालेल्या रिक्षा सुरू आहेत. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. भिवंडी ट्राफिक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवसभर आपल्या कार्यालयात बसतात. या गोष्टीकडे यांचे लक्ष नाही का ? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.? एकीकडे भिवंडी शहरात ट्राफिकचा बोजबारा वाजला आहे. उलट दिशेने ब्रिजवरून अनेक बाईक सुद्धा येताना दिसतात. त्यांना शिस्त नाही का ? तसेच रात्रीच्या वेळेस अनेक बाईकधारक (उडानटप्पू मुले) ट्रिपल सीट ,चोपल सीट सायलेन्सर नसलेली बाईक घेऊन रात्रभर फिरत असतात. मोठ्या आवाज होणारे सायलेन्सर या बाईक भिवंडी शहरात शेकडोच्या प्रमाणात आहेत. त्या तात्काळ जमा करण्यात याव्या अशी जनतेकडून होत मागणी आहे.

भिवंडी ट्राफिक पोलीस चोर सोडून संन्याशाला शिक्षा देण्याचे काम करत आहे. भिवंडी शहरात येणारे कोयला ओवरलोड ट्रक तात्काळ न बंद झाल्यास याची सविस्तर शूटिंग करून मंत्रालयात, गृह विभागात तसेच पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाच्या माध्यमातून दाखवण्यात येईल. तरी भिवंडी ट्राफिक पोलीस यावर कधी कारवाई करतात यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

Share.