Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –२१/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक मोठा निर्णय घेत कंपनीतील 10 टक्के व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. पिचाई यांचा हा निर्णय गुगलच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या “कार्यक्षमता वाढवण्या”च्या प्लॅनिंगचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. सुंदर पिचाई यांनी बुधवारी आयोजित एका ऑल-हॅन्ड्स मिटिंगमध्ये, या निर्णयाचा उद्देश गुगलची कार्यक्षमता दुप्पट करणे, असा असल्याचे कर्मचाऱ्यांसोबत बोलताना म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, ही कपात प्रामुख्याने मॅनेजर, डायरेक्टर आणि उपाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे.

Read More

दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भाजपने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माफी मागितली आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला. 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, रामदास आठवले यांच्या एकमेव आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. रामदास आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आम्हाला कोणतेही प्रतिनिधित्व देण्यात आले नाही. दरम्यान, रामदास आठवले यांना नागपुरातील शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रणही मिळाले नाही. त्याबद्दल भाजपने रामदास आठवले यांची माफी मागितली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “14 तारखेला शपथविधी होणार होता, पण आमचे आमदार…

Read More

दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मी काही लल्लू पंजू आहे का ? मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं मी मूर्ख आहे का? असे म्हणत भुजबळांनी अजित पवारांना सुनावले आहे. तसेच ते स्वत:ला सर्वांपेक्षा जास्त हुशार आणि जास्त शहाणे समजतात असाही टोला लगावत भुजबळांनी आपल्या मनातील खदखदच व्यक्त केली आहे. छगन भुजबळ म्हणाले, मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं मी मूर्ख आहे का? मी काही लल्लू पंजू आहे का?तुम्ही शब्द दिला म्हणजे काहीही करायचं का ? काय तर म्हणे…दादाचा वादा … माझा लढा मंत्रिपदाचा नाही अपमान आणि अस्मितेचा आहे. मी असा वादा वगैरे मानत नाही ही लोकशाही…

Read More

दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  सोनिया गांधी आपल्याला एकेकाळी मुख्यमंत्री करणार होत्या, असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना देखील दिल्या. “ज्यांनी आपलं काम नाही केलं आपण त्यांचं काम करायचं. सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं. कोणाविषयी राग ठेवायचा नाही. आपण सगळे एकजुटीने काम करायचं आहे. अडचणीच्या काळात देखील विरोधकांना मदत करणार. कोणाविषयी दुष्मनी विसरून जा. आरक्षणाचा भुलभूईय्या संपणार आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले. “काही लोकांनी अजित दादांना धन्यवाद दिले. कारण मला मंत्री केलं नाही. मंत्रिपद अनेकदा मिळाली. त्यामुळे आता नाही भेटलं, त्याचा काही वाद नाही.…

Read More

दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून उपराजधानी नागपुरात सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि विधानपरिषद आमदार उद्धव ठाकरे हे आज अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे हे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि ‍पदी विराजमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही सदिच्छा भेट घेतली असल्याची शक्यता आहे.

Read More

दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यात 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदनात उतरवले आहेत. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर फडणवीस सरकारला गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचा 15 ते 16 महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. मराठ्यांची आजही एकजूट कायम आहे. आजपर्यंत सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे सामूहिक उपोषण करण्याचा निर्णय झाला आहे. ज्यांची उपोषणाची तयारी आहे त्यांनी यावं. 25…

Read More

दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. रविवारी नागपुरात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ४२ झाली आहे. मंत्र्यांच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पूर्णपणे सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे या सरकारमध्ये तीन महिला अधिकारी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. महाराष्ट्रात डीजीपी, मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव या तिन्ही महत्त्वाच्या पदांची कमान महिला अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. सुजाता सौनिक यांच्याकडे मुख्य सचिवपदाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने 30 जून 2024 रोजी सुजाता सौनिक यांच्याकडे राज्याच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार सोपवला होता. यासह सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव…

Read More

दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. तपासादरम्यान, मनीषा आणि तिला मुलाची विक्री करण्यास मदत करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मुंबईतील माटुंगा पोलिसांनी लहान मुलांची अवैध तस्करी करणाऱ्या आठ जणांना अटक केली असून त्यात आपल्या मुलाची विक्री करणाऱ्या महिलेचाही समावेश आहे. महिलेच्या सासूच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. माटुंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा सुनी यादव (३२) या महिलेने तिच्या १७ महिन्यांच्या मुलीला बेंगळुरूमध्ये विकले. मुलाच्या विक्रीची फिर्याद मनीषाची सासू प्रमिला पवार (51) यांनी दिली असून त्यांनी घटनेची…

Read More

दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकराला त्यांच्या घरात एकत्र दिसल्यानंतर त्यांची हत्या केली, असे दिल्ली पोलिसांनी सोमवारी सांगितले. अजमत असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी पकडल्याची माहिती शास्त्री पार्क पोलीस ठाण्यात मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पीडितेला जग प्रवेशचंद्र रुग्णालयात नेण्यात आले आणि तपासणीनंतर गुरु तेग बहादूर रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्यावेळी ते कोणतेही निवेदन देण्याच्या स्थितीत नव्हते. पीडित आणि आरोपीच्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध होते, आरोपीच्या पत्नीचे मृत ऋतिक वर्मासोबत गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी घरी पोहोचला तेव्हा त्याला त्याची पत्नी मृतासोबत दिसली. यानंतर अजमतचा संयम सुटला आणि त्याने पत्नी आणि मृतकाला बेदम मारहाण…

Read More

दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे जेव्हा त्यांनी रामायण विषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास अपयशी ठरल्यानंतर तिच्या संगोपनाबद्दल काही टिप्पण्या केल्या होत्या. अनेक वर्षांपूर्वी घडलेली एक घटना समोर आणण्यासाठी तिने त्याला बोलावून घेतले आणि केवळ त्याच्या खर्चावर बातमी बनवली. 2019 मध्ये, सोनाक्षीने कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घेतला, त्यादरम्यान ती रामायणाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही. हे आठवत खन्ना काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाले होते, “लोकांना राग आला होता की सोनाक्षीला हे माहित नव्हते, पण मी म्हणेन की ही तिची चूक नाही – तिच्या वडिलांची…

Read More