Author: Team GarjaMaharashtra

दिनांक – ०२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबईच्या लालबाग परिसरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लालबाग परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. या अपघातामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर ८ जणांवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर लालबाग परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी सव्वा आठच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. बेस्ट बस क्रमांक ६६ नंबरची बस लालबागवरून जात असताना हा अपघात झाला. ही बस भाटियाबाग येथून राणी लक्ष्मीबाई चौकाकडे निघाली होती. यावेळी ही बस लालबागमधील गणेश टॉकीज परिसरात आली असता एका मद्यधुंद प्रवाशाने काही क्षुल्लक कारणांवरून चालकासोबत वाद घातला. हा प्रवासी थेट…

Read More

दिनांक – ०२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आजचा दिवस इतिहासात सूवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. एकाच इमारतीत १२ राज्यातील १२ समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच साकारले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासार वडवली येथील समाज भवनाच्या भूमिपूजन समारंभात केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे महापालिका क्षेत्रातील, ओवळा-माजिवडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन संपन्न झाले. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते. नागला बंदर येथे सर्वात…

Read More

श्रीगणेशोत्सवातील थर्मोकोलसारख्या सजावटींना पर्याय म्हणून पर्यावरणपूरक सजावटींचा अवलंब करण्याच्या `उत्सवी’ संस्थेचे प्रमुख नानासाहेब शेंडकर यांच्या २३ वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश मिळत असून यंदा त्यांच्या सजावटीना महाराष्ट्र मंडळ, लंडनसह देश-विदेशातील अनेक संस्थांकडून श्री गणेशोत्सवासाठी मागणी होत आहे. `अय़ोध्या राममंदिर’ या संकल्पनेवरील ही सजावट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली असून यंदा हे राममंदिर लंडनपर्यंत पोहचले आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच संस्थांकडून त्यासाठी आग्रह केला जात आहे. नानासाहेब शेंडकर यांनी पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी २००१ साली ही चळवळ सुरु केली. त्यासाठी थर्माकोल निर्मिती आणि सजावटीचा त्यांचा सुमारे १०० कामगार कार्यरत असलेला सुस्थितीतील कारखाना बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पुठ्ठ्यांपासून…

Read More

दिनांक – ०२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- बीएलएस इंटरनॅशनल या सरकार तसेच नागरिकांसाठी एक विश्वासू जागतिक स्तरावरील सेवा पुरवठादार भागीदार आणि व्हिसा प्रक्रिया व कॉन्सुलर सेवांमधील जागतिक आघाडीच्या कंपनीने आज आपण एसएलडब्ल्यू मीडियामध्ये ५१ टक्के समभाग ८०.२४ लाख रूपयांना खरेदी करण्यासाठी समभाग खरेदी करारनामा केल्याची घोषणा केली. एसएलडब्ल्यू मीडिया ही एक ख्यातनाम स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपनी असून तिला गोल्फ उद्योगात दोन दशकांपेक्षा जास्त कालावधीचा अनुभव आहे. हा ताबा बीएलएस इंटरनॅशनलच्या व्यापक जागतिक अस्तित्वाशी जुळणारा आहे. त्यातून ६६ देशांमध्ये त्यांच्या व्हिसा आणि पर्यटन सेवांमध्ये गोल्फचा समावेश सहज करणे शक्य होईल. हे धोरणात्मक पाऊल वाढत्या क्रीडा आणि प्रवास क्षेत्रात तर कामगिरी करतेच…

Read More

दिनांक – ०२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- किया इंडिया या देशातील अत्यंत वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम कार निर्मात्या कंपनीने आज नवीन लवचिक मालकीचा ‘किया सबस्क्राइब’ प्लॅन बाजारात आणला आहे. कंपनीने एएलडी ऑटोमोटिव्ह प्रा. लि.सोबत एक सामंजस्य करार केला असून त्यातून त्यांच्या लवचिक मालकी प्रोग्राम्सचा विस्तार केला जाईल. ही भागीदारी कियाच्या लीजिंग आणि सबस्क्रिप्शन सेवा भारतभरातील १४ मोठ्या शहरांमध्ये देणार आहे. त्यात मुंबई, पुणे, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, गुरगाव, अहमदाबाद, इंदोर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि जयपूर यांचा समावेश आहे. किया लीज प्रोग्राम या दीर्घकालीन कालावधीच्या योजनांच्या यशानंतर कंपनीने लघुकालीन किया सबस्क्राइब आणला आहे. हा वेतनदार लोकांसाठी उत्तम असून गाडी वापरात…

Read More

दिनांक – ०२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- इनोटेरा या अल्‍पभूधारक कृषी अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍यासोबत आरोग्‍यदायी खाद्य पुरवठ्याची खात्री घेण्‍यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या स्विस-इंडियन अन्‍न व तंत्रज्ञान प्‍लटॅफार्म कंपनीने त्‍यांची उपकंपनी मिल्‍कलेनच्‍या आयुष कॅटल फीड व्‍यवसाय लाइनच्‍या विस्‍तारीकरणाची घोषणा केली आहे. पशु खाद्य उद्योगामध्‍ये प्रबळ उपस्थितीसह इनोटेरा आता प्रीमियम विभागाच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आपली उत्‍पादन लाइन विस्‍तारित करत आहे. या धोरणात्‍मक पुढाकाराचा भाग म्‍हणून ब्रँड प्रीमियम बाजारपेठेवर लक्ष्‍य करत आयुष सुप्रीम आणि आयुष वर्धन हे दोन नसीन एसकेयू लाँच करत आहे. ही नवीन प्रीमियम उत्‍पादने आयुष सुप्रीम आणि आयुष वर्धनमध्‍ये अनुक्रमे २२ टक्‍के व २४ टक्‍के क्रूड प्रोटीन आहे.…

Read More

दिनांक – ०२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते देशातील ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. श्री षण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभेने षण्मुखानंद सभागृह येथे रविवारी (दि. १) आयोजित केलेल्या ‘नादस्वर उत्सव’ या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते युवा व होतकरू नादस्वरम वादकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. सभेतर्फे ही शिष्यवृत्ती तीन वर्षे देण्यात येणार आहे. राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रसिद्ध नादस्वर वादक शेषमपट्टी श्री टी शिवलिंगम यांना श्री षण्मुखानंद नादस्वरम चक्रवर्ती संगीत कला विभूषण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अडीच लाख रुपये रोख, सुवर्ण लेपित कांस्याचा दिवा, नादस्वरम आणि…

Read More

12 लाखांपेक्षा जास्त तरुणांना मिळणार रोजगार जगातील 10 मोठ्या बंदरातील वाढवण मोठे बंदर दिनांक – ३१/०८/२०२४, पालघर प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रासह देशाच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोलाचे ठरणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपुजन होत आहे. वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिखर ठरणार आहे. या बंदरामुळे जगातील पहिल्या दहा कंटेनर पोर्टच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट होणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला चालना मिळणार असून 12 लाखापेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर येथे केले. 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री…

Read More

दिनांक – ३१/०८/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- शालेय शिक्षण विभागामध्ये 2024 मध्ये कोणाची बदली करण्याचा प्रश्नच नव्हता. बदल्याच होणार नसल्याने त्यासाठी पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच यापूर्वीही बदल्या होताना त्यासाठीही कधीही पैसे घेतले जात नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रेट कार्ड जाहीर केले असल्याच्या आशयाची बातमी एका डिजिटल माध्यमामध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे, बदल्याच होणार नसल्याने या बातमीत कोणतेही तथ्य नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सन 2024 मधील नियमित बदल्या करण्यासंदर्भात राज्य शासनाने आदेश दिलेले नव्हते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागांतर्गत बदल्या होणार नाहीत, असे शालेय…

Read More

दिनांक – ३१/०८/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- झिप इलेक्ट्रिक या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान-सक्षम ईव्‍ही अॅज-ए-सर्विस प्‍लॅटफॉर्मने ईव्‍ही सेगमेंटमधील अद्वितीय फ्रँचायझी प्‍लॅन झिपएक्‍सच्‍या लाँचची अभिमानाने घोषणा केली आहे. यामुळे भारतातील व भारताबाहेरील विविध भागांमधील ईव्‍ही असेट्स, प्रक्रिया व व्‍यक्‍तींना एकत्र करत कार्यसंचालनांचे डिजिटलायझेशन करण्‍यास मदत होईल. झिपने भारतातील द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या बाजारपेठांमधील फ्लीट ऑपरेटर्सना सक्षम करण्‍यासाठी फुल-स्‍टॅक सास प्‍लॅटफॉर्म डिझाइन केला आहे, ज्‍यामुळे झिप फ्रँचायझी मॉडेलला त्‍यांच्‍या नगरांमध्‍ये/शहरांमध्‍ये लाँच करण्‍याचा पर्याय मिळेल. झिपएक्‍ससह फ्लीट अॅग्रीगेटर्स, लॉजि‍स्टिक्‍स कंपन्‍या आणि आता नवीन उद्योजक झिपएक्‍सच्‍या क्षमतेचा फायदा घेत त्‍यांच्‍या कार्यसंचालनांना विनासायासपणे व्यवस्‍थापित करू शकतात, प्रगत एआय, आयओटी व मशिन लर्निंग तंत्रज्ञानांचा वापर…

Read More