Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सुनील केदार यांनी 22 वर्षांपूर्वी केलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 153 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात व्याजासह 1444 कोटींच्या वसुलीच्या कारवाईसाठी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे टाळाटाळ करीत आहेत. तांत्रिक अडचणी सांगून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व सुनील केदार हे वसुलीसाठी अडथळे निर्माण करत आहेत. तात्काळ वसुली करून ती पिडीत खातेदार व शेतकऱ्यांना वाटप करावी, अशी मागणी रामटेक येथील बेधडक वसुली मोर्चात सहभागी हजारो पिडीत शेतकरी व खातेदारांनी केली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पिडीत शेतकरी व खातेदार संघटना, रामटेक व पारशिवनी तालुकातर्फे दि. 13 सप्टेंबर 2024 ला हा भव्य बेधडक वसुली…

Read More

दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- बौद्ध धर्म हा कर्मावर आधारित आहे. या धर्मात हिंसा नावाची कुठलीही गोष्ट नसून भगवान बुद्ध यांनी जगाला अहिंसा, दया, करुणा हा संदेश दिला आहे. विश्व सेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करायला हवे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी केले. केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाद्वारे ‘बुद्धांचा मध्यममार्ग – जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शक’ या विषयावर मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे विशेष परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्री. रिजिजू बोलत होते. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. दामेंडा पोरजे यांच्यासह…

Read More

दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली. मुंबईतील लालबागचा राजा, मुंबई सेंट्रल येथील हमाल मंडळाचा गणपती तसेच गिरगावच्या केशवजी नाईक चाळ येथील मुंबईतील पहिल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्या गणपतीस भेट देऊन राज्यपालांनी दर्शन घेतले. हमाल मंडळाच्या गणपतीची आरती करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी तेथील गणेश भक्तांशी संवाद साधला. केशवजी नाईक चाळ येथील गणेशोत्सवाची परंपरा त्यांनी जाणून घेतली.

Read More

दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सोयाबीनची ९० दिवसांनी हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल, असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला असून या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. राज्यात सोयाबीनचा पेरा ५२ लाख हेक्टर पेक्षा जास्त झाला असल्याने तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाले असल्याने सोयाबीनचे उत्पन्न वाढणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा, यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने प्रयत्न करीत असून त्या दृष्टिकोनातून त्यांनी केंद्र शासनाकडे सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी, खाद्यतेल, सोया मिल्क,…

Read More

दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी…

Read More

दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री श्री. केसरकर यांनी उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांची भेट घेवून शासनाची भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत मागण्यांबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे योग्य होईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी…

Read More

दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे झाली आहे. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे व पोस्टरचे प्रकाशनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष…

Read More

दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील दुचाकी, तीनचाकी, क्वाड्री सायकल, फायर टेंडर्स, रुग्णवाहिका आणि पोलीस विभागाची वाहने वगळून इतर सर्व वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार अशा वाहनांना वेग नियंत्रक बसविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून काही प्रकाराच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र काढतांना वाहनधारकांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासर्व तक्रारींचे निवारण करण्याकरिता कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे, त्याचा अवलंब करावा, असे आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यपद्धतीनुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या २ फेब्रुवारी २०१८ च्या पत्रान्वये परिवहन संवर्गातील वाहनांना बसविण्यात…

Read More

दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सध्याच्या नैसर्गिक परिस्थितीमुळे शेती क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण होतात. अवेळी पाऊस, ओला दुष्काळ, पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग आदींमुळे शेतकऱ्याला हातात आलेले पिक मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून पिकासाठी विमा काढण्याचा निर्णय शासनाने घेतला. या पिक विम्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे. पूर्वी शेतकऱ्यांना पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम द्यावी लागत होती. मात्र, आता तर राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राज्यातील बळिराजाला मोठा आधार मिळाला आहे. पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहण्याच्या दृष्टीने केंद्र…

Read More

दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजबांधवांसाठी १२ हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी आज विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे ६० वर्षांपासूनचे स्वप्न येत्या ३ वर्षांत साकार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ सभागृहात यासंदर्भातील आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता यानिमित्ताने होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत ही घरे बांधली जाणार असून म्हाडाने यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पासाठी ३० एकर जागा प्रियांका होम्स रियालिटी देणार असून, नमन बिल्डर ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर हे काम करणार आहेत. यातून…

Read More