Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –१८/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नेत्रदान हे महान कार्य असून या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यानंतर इतरांच्या माध्यमातून जगू शकतो. यासाठी नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत नेत्रदान संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा आज राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला. राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सह सचिव श्वेता सिंघल, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, नेत्र शल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख…

Read More

दिनांक –१७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर भर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयी- सुविधा उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ‘चिठ्ठीमुक्त घाटी’ या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाचे कौतुक केले. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज भेट देऊन अतिविशेषोपचार रुग्णालयाची पाहणी केली आणि डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी खासदार सर्वश्री डॉ. भागवत कराड, संदीपान भुमरे, कल्याण काळे, आमदार…

Read More

दिनांक –१७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर येथे आले असतांना केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार सर्वश्री डॉ.भागवत कराड, संदिपान भुमरे, कल्याण काळे, आमदार सर्वश्री प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत आदी उपस्थित होते

Read More

दिनांक –१७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सामान्यतः गणपती विसर्जनानंतर पितृ पक्षाला सुरुवात होते. दरवर्षी पितृ पक्ष भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. तर अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला पितृ पक्ष समाप्त होतो. या वर्षी 17 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू होत आहे. तर 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येला पितृ पक्ष समाप्त होईल. या दरम्यान, तिथी पाहून पूर्वजांचं श्राद्ध घातलं जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, पितृ पक्षाच्या काळात पितरं पृथ्वीवर वास करतात. यावेळी तृप्त किंवा अतृप्त अशा सर्व पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान वगैरे केली जातात, यामुळे पितरांचा आत्मा शांत होतो. यंदा पितृ पक्षावर चंद्रग्रहणाचं सावट यंदा पितृपक्षावर चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहणांचं सावट…

Read More

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जागतिक तापमान वाढीचे युग संपून आता होरपळीचे युग सुरू झाले आहे. त्यामुळे आता त्वरीत कार्यवाही करणे आणि निर्णय घेण्याची वेळ आल्याचे आवाहन संयुक्त राष्ट्र संघटनेने केले आहे. सध्या वातावरणामध्ये होत असलेल्या बदलांचा विचार करता खरोखरच त्वरीत कार्यवाहीची गरज निर्माण झाल्याचे दिसते आहे. संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या या आवाहनाला तातडीने प्रतिसाद दिला तो भारत देशाने. भारतात याविषयी त्वरीत कार्यवाहीची सुरुवात केली आहे ती महाराष्ट्र शासनाने. त्यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात युरोप आणि अमेरीकेतील राष्ट्रांमध्ये जी होरपळ दिसून आली तशी परिस्थिती आपल्याकडे फारच थोड्या प्रमाणात दिसून आली. होरपळ कमी करण्यात महाराष्ट्राला आलेले यश महत्वाचे तर आहेच. पण सर्वात…

Read More

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.८४ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि. १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १६ ऑक्टोबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने वरील दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १६ ऑक्टोबर, २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही. सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४(२) व २४(३) अनुसार,…

Read More

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेकरिता राज्यात ६ लाख २५ हजार १३९ अर्ज पात्र झाले आहेत. राज्यात मुंबई विभागात ६३ हजार ९०, नाशिक विभागात १ लाख १२ हजार ७६१, पुणे विभागात ९१ हजार ६२५, अमरावती विभागात १ लाख ३२ हजार ७५८, नागपूर विभागात १ लाख १० हजार ४५५, छत्रपती संभाजीनगर विभागात ४२ हजार ९७६ लातूर विभागात ७१ हजार ४७४ अर्ज पात्र झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य…

Read More

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पेटीएम ही भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्‍यूआर, साऊंडबॉक्स व मोबाइल पेमेंट्सच्‍या अग्रणी कंपनीने गुरूवारी आपल्‍या २४व्‍या अॅन्‍युअल जनरल मीटिंग (एजीएम)मध्‍ये अनुपालन-केंद्रित दृष्टिकोनासह लाभक्षमतेप्रती कटिबद्धतेची पुष्‍टी दिली, जेथे कंपनीने आपल्‍या मुलभूत पेमेंट्स व्‍यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. “मुलभूत पेमेंट्स व्‍यवसायाप्रती कटिबद्धतेसह आमचा लवकरच पीएटी लाभक्षमता वि‍तरित करण्‍याचा मनसुबा आहे,” असे शर्मा म्‍हणाले. एजीएममध्‍ये पेटीएमचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर शर्मा यांनी क्‍यूआर कोड व साऊंडबॉक्‍स यांसारख्‍या कंपनीच्‍या अग्रगण्‍य नाविन्‍यतांच्‍या माध्‍यमातून भारतातील डिजिटल पेमेंट्स क्रांतीमध्‍ये पेटीएमच्‍या मोठ्या भूमिकेला दाखवले. ते म्‍हणाले, “आम्‍ही भारतातील व्‍यवसाय आणि लघु व्‍यापाऱ्यांसाठी नेहमी जागतिक…

Read More

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- उदरनिर्वासाठी गावभर गेलेल्या ग्रामस्थांकरीता दूरदृष्टी प्रणाली द्वारे ग्रामसभा घेण्याबाबत ग्राम विकास मंत्री गिरीशभाऊ महाजन व प्रधान सचिव एकनाथ डवले यांना रुग्ण हक्क परिषदेचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी लेखी निवेदन ई-मेल द्वारे पत्र पाठवून जोरदार मागणी केली आहे. यावेळी मुलाणी म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात 36 जिल्ह्यात 358 तालुक्यात एकूण 28813 ग्रामपंचायती आहेत. उक्त जिल्ह्यातील विविध गावांतील ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांना अनेकदा रोजगार किंवा उदरनिर्वाहाच्या आवश्यकतेमुळे आपल्या गावांपासून दूर 500 कि.मी. अंतरापेक्षा अधिक अन्य ठिकाणी वास्तव्यास जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना गावात नियमितरित्या होणाऱ्या ग्रामसभांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणे कठीण असते. यामुळे गावाच्या विकासप्रक्रियेत त्यांचा सक्रिय…

Read More

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ईद ए मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद ए मिलाद हा सण त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद ए मिलादच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधु – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Read More