दिनांक –२५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय रायगड अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना डिपीडीसी अंतर्गत Innovative Fund मधून माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या चार ठिकाणी महिला बचत गटातील महिलांना स्थानिक रोजगार मिळावा म्हणून प्रत्येक गारमेंट युनिट करिता आवश्यक असलेल्या शिलाई मशीन्स 7, काज-1, 1 बटण-1 ओव्हार्लोक मशीन-1 कटिंग मशीन 1 व इस्री-1, खरेदी करण्यात आल्या आहेत. या मशीन्सवर गारमेंटच्या अनुषंगाने गाऊन, पेटीकोट, लेगीज व टॉप, टी शर्ट, कापडी बॅग, मुस्लीम समाजासाठी लागणारे बुरका व शालेय गणवेश इत्यादी कामाचे सुपरव्हिजन करणे व महिलांना प्रशिक्षण देण्याकरीता माणगाव, तळा, म्हसळा, व श्रीवर्धन…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- टीमलीज डिजिटल या आघाडीच्या टेक स्टाफिंग व लर्निंग सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीने आर्थिक वर्ष २५ साठी भारतभरातील ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्सचे (जीसीसी) राज्यवार वितरण जाहीर केले आहे. हा डेटा टीमलीज डिजिटलच्या संशोधनावर आधारित असून, जीसीसींच्या प्रादेशिक केंद्रीकरणाबद्दल तसेच त्यांच्या वाढीला चालना देणाऱ्या उद्योगक्षेत्रांबद्दल महत्त्वाची माहिती उघड करतो. या निष्कर्षांनुसार टीमलीज डिजिटलच्या जीसीसी भागीदारींपैकी ३१ टक्के मुंबई-पुणे भागात आहेत. या क्षेत्रात उच्च तंत्रज्ञान व ऑटोमोटिव (वाहन) ही क्षेत्रे सर्वांत महत्त्वाची आहेत, संख्येच्या निकषावर उच्च-तंत्रज्ञान (हाय-टेक) उद्योगाचा वाटा ३३ टक्के, तर वाहन ऑटोमोटिव क्षेत्राचा वाटा २२ टक्के आहे. विशेषत: पुणे भाग ऑटोमोटिव क्षेत्रात चालक म्हणून उदयाला येत…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- डॉ. रतीश तागडे यांनी “VIBGYOR” – ही एक निओ शास्त्रीय संगीत फ्यूजन कॉन्सर्टची संकल्पना मांडली आहे. यात ७ चक्रे, ७ म्युझिकल नोट्स, ७ संगीतकार, ७ संगीत शैली आणि ७ रंग यांच्यातील परस्पर संबंध रसिकांना अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने २ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. या मैफिलीत व्हायोलिनवर डॉ. रतीश तागडे, मृदंगमवर श्रीधर पार्थसारथी, कीबोर्डवर अतुल राणिंगा, तबल्यावर ओजस अधिया, बासरीवर निनाद मुळोकर, गायकीवर गंधार देशपांडे, गायनावर शिवानी वासवानी आणि ड्रम्स वर वर प्रियाश पाठक आहेत. दुस्थानी शास्त्रीय संगीत, भक्ती संगीत, गझल, सूफी,…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुळशी धरण भागातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना पिण्यासह सिंचनासाठी पाणी, दळणवळणाच्या सुविधा, विद्युत दाहिनी यासारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधा मिळण्याच्या दृष्टीने वारंवार निर्देश देऊनही टाटा पॉवरकडून सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुळशी धरण भागातील टाटा पॉवर कंपनीच्या वापरात नसलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करुन वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमिनी सार्वजनिक कामासाठी शासनाच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे विभागीय आयुक्तांना दिले. मुळशी धरण भागातील नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आज मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला. व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- देशात साजरा केला जाणारा प्रत्येक सण समाजाला एकत्र आणण्याचे काम करतो. ओणम हा प्राचीन सण साजरा करताना केरळीय समाजामार्फत सांस्कृतिक वारसा जपला जातो, ही उत्साहवर्धक बाब असून सर्वांनी आजही समर्पक असणाऱ्या एकता, करुणा आणि सेवा या मूल्यांचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. बॉम्बे केरळीय समाजाच्या वतीने आज मुंबईत ओणम उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजासाठी योगदान देणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘विशाल केरलम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बॉम्बे केरळीय समाजाचे अध्यक्ष डॉ. एस. राजशेखरन, मानद सचिव विनोदकुमार नायर,…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारतातील आघाडीची ड्रोन तंत्रज्ञान कंपनी आयोटेकवर्ल्ड एविगेशन आणि एक प्रमुख सहकारी संस्था इफको यांच्या भागीदारीमुळे डिसेंबर २०२३ पासूनच्या केवळ ८ महिन्यांत ११ भारतीय राज्यांतील ५०० पेक्षा जास्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. या भागीदारीतून ५०० ड्रोन शेतीच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी समर्पित केले गेले आहेत. या उपक्रमाचा उद्देश शेती पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणणे आणि भारतातील शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याचा आहे. नुकतीच आयोटेकवर्ल्ड आणि इफको यांनी ‘एग्रीबोट’ ड्रोन ग्राहकांसाठी एक विशेष मर्यादित कालावधीसाठी ऑफर जाहीर केली आहे, ज्यात शेतकरी आणि सेवा प्रदात्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. या अनन्य…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नवे सांस्कृतिक धोरण हे सर्वंकष व व्यापक असून महाराष्ट्राला देशात अव्वल बनवेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्याच्या सांस्कृतिक धोरण-2024 ला कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या नवीन सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीकरिता एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार लवकरच ही समिती जाहीर करतील. सांस्कृतिक धोरणाच्या शिफारशी केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे श्री मुनगटीवार यांनी सांगितले. राज्याचे सांस्कृतिक धोरण 2010 चे पुनर्विलोकन करण्यासाठी 2022 मध्ये मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचे…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्यक्रम-२०३० संदर्भात केंद्र शासनाच्या प्रयत्नांसाठी महाराष्ट्राची बांधिलकी आणि योगदान महत्वाचे आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि कृषी या क्षेत्रांच्या विकासासाठीचा एकात्मिक दृष्टीकोन स्विकारण्यात आला आहे. शाश्वत विकास उद्दिष्टपूर्ती बरोबरच भारताला समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक महत्वाचे ठरत आहे, असे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाच्या (CPA India Region) १० व्या परिषदेत ते बोलत होते. नवी दिल्ली येथे दिनांक २३ व २४ सप्टेंबर, २०२४ रोजी लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद “शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासंदर्भात…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दुर्गम अति दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे देशातील ६३ हजार तर महाराष्ट्रातील ४ हजार ९७५ आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. त्यामाध्यमातून राज्यामधील ३२ जिल्ह्यातील १२ लाख ८७ हजार ७०२ आदिवासी बांधवाचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे. या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली होती. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अभियानाला…
