दिनांक –२५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १२ ऑगस्ट, २०२४ रोजी महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ करिता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील ठाणेकर किरण अशोक हे अराखीव व मागासवर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत. तसेच नांदेड जिल्हयातील अश्विनी भुजंगराव गायकवाड या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण आणि अधिक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असल्याचे आयोगाने कळविले आहे.
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –२५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ‘मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण व अन्य उपक्रमांना अधिक पाठबळ देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, पदभरती मुळे या उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडील नवनियुक्त संपादकीय सहायक व शिपाई या गट क संवर्गातील उमेदवारांना मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ.शामकांत देवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मिनाक्षी पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रभारी…
दिनांक –२५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानुसार तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. तसेच सर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे…
दिनांक –२५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी ‘इ-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या ‘इ-टेक्सटाईल’ प्रणालीचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंह व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्याचे नवीन एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत लघु वस्त्रोद्योगाला चालना देऊन या माध्यमातून अधिक रोजगार निर्मिती करावी अशा सूचना श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. वस्त्रोद्योग विभागाच्या विविध योजनांकरिता एण्ड टू एण्ड प्रोसेस ॲटोमेशन करण्यासाठी ही प्रणाली नव्याने तयार करण्यात आली…
दिनांक –२५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रगतीपथावरील प्रकल्प पूर्ण करून राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. राज्यात २१ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होवून बळीराजाला सिंचनासाठी आणि शहरे, गावे यांना पाणीपुरवठ्यासाठी पाण्याची चिंताही मिटेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. जलसंपदा विभागाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये बांधकामाधीन २१ प्रकल्पांना…
दिनांक –२५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय रायगड अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना डिपीडीसी अंतर्गत Innovative Fund मधून माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या चार ठिकाणी महिला बचत गटातील महिलांना स्थानिक रोजगार मिळावा म्हणून प्रत्येक गारमेंट युनिट करिता आवश्यक असलेल्या शिलाई मशीन्स 7, काज-1, 1 बटण-1 ओव्हार्लोक मशीन-1 कटिंग मशीन 1 व इस्री-1, खरेदी करण्यात आल्या आहेत. या मशीन्सवर गारमेंटच्या अनुषंगाने गाऊन, पेटीकोट, लेगीज व टॉप, टी शर्ट, कापडी बॅग, मुस्लीम समाजासाठी लागणारे बुरका व शालेय गणवेश इत्यादी कामाचे सुपरव्हिजन करणे व महिलांना प्रशिक्षण देण्याकरीता माणगाव, तळा, म्हसळा, व श्रीवर्धन…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- टीमलीज डिजिटल या आघाडीच्या टेक स्टाफिंग व लर्निंग सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीने आर्थिक वर्ष २५ साठी भारतभरातील ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्सचे (जीसीसी) राज्यवार वितरण जाहीर केले आहे. हा डेटा टीमलीज डिजिटलच्या संशोधनावर आधारित असून, जीसीसींच्या प्रादेशिक केंद्रीकरणाबद्दल तसेच त्यांच्या वाढीला चालना देणाऱ्या उद्योगक्षेत्रांबद्दल महत्त्वाची माहिती उघड करतो. या निष्कर्षांनुसार टीमलीज डिजिटलच्या जीसीसी भागीदारींपैकी ३१ टक्के मुंबई-पुणे भागात आहेत. या क्षेत्रात उच्च तंत्रज्ञान व ऑटोमोटिव (वाहन) ही क्षेत्रे सर्वांत महत्त्वाची आहेत, संख्येच्या निकषावर उच्च-तंत्रज्ञान (हाय-टेक) उद्योगाचा वाटा ३३ टक्के, तर वाहन ऑटोमोटिव क्षेत्राचा वाटा २२ टक्के आहे. विशेषत: पुणे भाग ऑटोमोटिव क्षेत्रात चालक म्हणून उदयाला येत…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- डॉ. रतीश तागडे यांनी “VIBGYOR” – ही एक निओ शास्त्रीय संगीत फ्यूजन कॉन्सर्टची संकल्पना मांडली आहे. यात ७ चक्रे, ७ म्युझिकल नोट्स, ७ संगीतकार, ७ संगीत शैली आणि ७ रंग यांच्यातील परस्पर संबंध रसिकांना अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने २ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. या मैफिलीत व्हायोलिनवर डॉ. रतीश तागडे, मृदंगमवर श्रीधर पार्थसारथी, कीबोर्डवर अतुल राणिंगा, तबल्यावर ओजस अधिया, बासरीवर निनाद मुळोकर, गायकीवर गंधार देशपांडे, गायनावर शिवानी वासवानी आणि ड्रम्स वर वर प्रियाश पाठक आहेत. दुस्थानी शास्त्रीय संगीत, भक्ती संगीत, गझल, सूफी,…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुळशी धरण भागातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना पिण्यासह सिंचनासाठी पाणी, दळणवळणाच्या सुविधा, विद्युत दाहिनी यासारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधा मिळण्याच्या दृष्टीने वारंवार निर्देश देऊनही टाटा पॉवरकडून सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुळशी धरण भागातील टाटा पॉवर कंपनीच्या वापरात नसलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करुन वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमिनी सार्वजनिक कामासाठी शासनाच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे विभागीय आयुक्तांना दिले. मुळशी धरण भागातील नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आज मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला. व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती…
