दिनांक – ०१/०१/२०२६,मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- बृहन्मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई पोलिसांच्या झोन ३ (मध्य विभाग) ने गेल्या दोन महिन्यांत एक महत्त्वपूर्ण वसुली मोहीम राबवली आहे, ज्यामध्ये चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन आणि इतर चोरीला गेलेले मालमत्ता यशस्वीरित्या जप्त करण्यात आली आहे. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर, गुन्हे अन्वेषण युनिट्स, सायबर अधिकारी आणि झोन ३ मधील सर्व पोलिस ठाण्यांमधील पोलिस कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांसह सातत्यपूर्ण आणि समन्वित कारवाईद्वारे एकूण ५२३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. झोन ३ मधील स्टेशननिहाय जप्तींमध्ये आग्रीपाडा (१२१), नागपाडा (१०९), भायखळा (१०३), ताडदेव (७५), वरळी (६३) आणि एन.एम. जोशी…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक – ०१/०१/२०२६, कल्याण प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी आणि नागरिकांचा प्रवास सुलभ व्हावा, या उद्देशाने वालधुनी उड्डाणपुलाची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार अवघ्या 8 दिवसांत ही दुरुस्ती पूर्ण करून हा उड्डाणपूल सोमवारपासून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. काम 8 दिवसांत झाले पूर्ण या निर्णयामुळे कल्याण – डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शेजारील शहरांतील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुरुस्ती कामासाठी महानगरपालिकेने सुरुवातीला २० डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत पुल २० दिवस बंद ठेवण्याची परवानगी वाहतूक पोलिसांकडे मागितली होती. मात्र, 24 तास सुरू…
ओम साई होम सोसायटी,पद्मशा सोसायटी,आयोध्या सोसायटी या भागातील सर्व रहिवाशांना ओपन जिम व गार्डनच्या सुविधेचा लाभ मिळणार… दिनांक – १६/१२/२०२५, भिवंडी प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी शहरातील दानशूर व्यक्तिमत्व आपल्या स्वभावाने सर्वांना आपलेसे बनवणारे अनेक वेळा भिवंडी मनपा प्र.क्र.१३. मधून नगरसेवक राहिलेले, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे श्री.बाळाराम मधुकर चौधरी यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती न.ग.रा.त्थान अभियान जिल्हास्तरीय योजने अंतर्गत भिवंडी महानगर पालिकेकडून उद्यानाचे काम पूर्ण श्री.बाळाराम चौधरी यांनी करून घेतले. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना या उद्यानाचा लाभ मिळायला सुरुवात झाली. स्थानिक बालगोपाल यांना गार्डनमध्ये खेळण्यासाठी सुविधा मिळाली, तसेच ज्येष्ठ नागरिक यांना सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी (वॉकिंग)…
दिनांक – २९/१०/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-विरार पश्चिमेकडील विनय युनिक स्काय इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. मृताचे नाव गोलम किब्रिया (४५) असे आहे. मंगळवारी संध्याकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना घडली आणि पोलिस तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. विरार पश्चिमेतील विनय युनिक स्काय इमारत ही २५ मजली इमारत आहे ज्याचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. किब्रिया त्यांची शिफ्ट पूर्ण करून कामावरून निघत असताना हा अपघात झाला. इमारतीतील कमी प्रकाशामुळे किब्रिया स्पष्टपणे पाहू शकले नाहीत आणि ते १३ व्या मजल्यावरून थेट लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर…
दिनांक – २९/१०/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये चालणाऱ्या महानगरपालिका शाळांमधील १९,३१७ इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना बीएमसी नवीन टॅब्लेट वितरित करणार आहे. या टॅब्लेटवर एक वर्षाची वॉरंटी आणि चार वर्षांची देखभाल असेल. ई-कंटेंट आणि देखभाल सेवांसह ते खरेदी करण्यासाठी मेसर्स स्किल ट्री कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण खर्च ₹४९.१९ कोटी आहे, जो प्रति विद्यार्थी अंदाजे ₹२५,४६४ इतका होतो. विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने २०१५ मध्ये टॅब्लेट वितरण योजना सुरू केली. हा उपक्रम २०१८ पर्यंत तीन वर्षे आणि पुन्हा २०२१-२२ मध्ये सुरू राहिला. या योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये नववीच्या विद्यार्थ्यांसाठी १८,०७८ टॅब्लेट खरेदी…
उपायुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकारी कोण जो निलेश संखेना घालतोय पाठीशी संखेने नुकतेच कोणाला दिले दोन लाखांचे दिवाळी पॅकेट? याबाबत पालिकेत चर्चा… निलेश संखे यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप उद्यान विभाग,वृक्ष प्राधिकरण आणि पर्यावरण विभागात अनेक भ्रष्टाचार. दिनांक – १३/१०/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत भ्रष्टाचार आणि नेहमीच वादग्रस्त सेटिंग बाज अधिकारी म्हणून ओळखले जाणारे श्री.निलेश संखे ही नेहमी चर्चेत असतात. श्री.निलेश संखे यांच्याकडे अंदाजे तीन ते चार खात्याचा अतिरिक्त पदभार आहे. यांच्याविरुद्ध अनेक सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी निवेदन देऊन आवाज उठवला आहे. परंतु त्यांच्यावर कार्यवाही काहीच केली नाही. याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोण उपायुक्त दर्जाच्या वरिष्ठ…
दिनांक – १३/१०/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कल्याण एम.पी.सी.बी अंर्तगत अनेक बेकायदेशीर कारखाने आहेत त्या मधून कल्याण एम.पी.सी.बी कार्यालयाला करोडो रुपयांचा मासिक हप्ता जातो? अनेक अधिकारी करोडपती होऊन प्रमोशन घेऊन पुन्हा पदाचा दुरुपयोग करत आहेत हेड ऑफिस मध्ये बसून. कल्याण एम.पी.सी.बी कार्यालय हे खूप मोठे आर्थिक व्यवहाराचे केंद्र मानले जाते.या कार्यालयाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे.या ठिकाणी फिल्ड ऑफिसर असतील किंवा छोट्यातल्या छोटे अधिकारी असतील हे स्थानिक कारखानदारांकडून जोरदार धम्माल वसुली करत आहे.यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. नुकतेच एम.पी.सी.बी कार्यालय सायन येथे नवनिर्वाचित सदस्य सचिव देवेंद्र सिंग यांच्यासमोर खूप मोठे आव्हान कल्याण एम.पी.सी.बी कार्यालय आहे.कल्याण एम.पी.सी.बी साठी नवीन रणनीती देवेंद्र…
दिनांक – १०/१०/२०२५ गणेश पुजारी,गर्जा महाराष्ट्र न्यूज :- वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती अनेक असल्या तरी उल्हासनगरातील विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गरड यांनी आपला वाढदिवस साजरा करण्याचा जो आदर्श ठेवला, तो समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. गरड यांनी आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक आणि सहकाऱ्यांना आवाहन केले की, “माझ्या वाढदिवसानिमित्त शाल, हार, बुके न आणता पूरग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करा.” त्यांच्या या भावनिक आवाहनाला समाजातील अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सामाजिक भावनेतून दशरथ गायकवाड, नितीन सपकाळे, निलेश बोबडे, बंसराज विश्वकर्मा, हरी शिंदे, पिंटू भालेराव, विजय गायकवाड, कृष्णा साळुंखे, सुनील सोनवणे, राजू गायकवाड, पुष्पक फेगडे, अजय वाखरकर, साई ग्राफिक्स, सागर जाधव, आकाश वाघमारे, मनीष वलेचा,…
दिनांक – ०१/१०/२०२५ गर्जा महाराष्ट्र न्यूज :- पाचोरा तालुक्यात शहरात, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामध्ये चार चाकी,दोन चाकी वाहन विना नंबर प्लेट शहरात आणि गावात फिरत आहे. यामध्ये टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल अथवा मोठा ट्रक असेल किंवा तीन चाकी तसेच ट्रॅक्टर अशा विविध प्रकारे वाहनांचा समावेश आहे. राजकीय पक्षाचे बॅनर, सिम्बॉल लावून बिंदासपणे लोक वावरत आहे. यामुळे अनेक गुन्हेगारी टोळीला वाव मिळणार आहे. रात्री-अपरात्री संशयित गाड्या पाचोरा शहरात फिरताना आढळून येत आहे. तसेच दिवसा ढवळ्या अनेक वाहन विना नंबर प्लेटचे पाचोरा शहरात मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहे. पाचोरा पोलिसांच्या डोळ्यावर…
दिनांक – ०१/१०/२०२५,गणेश पुजारी,मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचे जीवन वाहिनी अर्थात मुबंई लोकलची अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी येथील प्रवाशांनी अंबरनाथ येथून ०८:४९ मिनीटांनी सुटणारी अंबरनाथ-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणाऱ्या लोकल ट्रेनची सजावट करत दसरा आनंद उत्सव साजरा केला.रेल्वे प्रवाशांसाठी लोकल आणि रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवसांकडे पाहिलं जातं दसऱ्याच्या आदल्या दिवशी अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी रेल्वे प्रवाशांनी उत्साहात दसरा साजरा केला. ग्रुप मधील सर्व प्रवाशांनी स्वइच्छेने वर्गणी काढून रेल्वेतील आपल्या डब्याची रंगीबेरंगी पताका फुगे आणि फुलांची आरास करून प्रवाशांनी लोकलचे डबे सजवले इतकच नाही तर लोकलचे पूजन करून मोटार मन तसंच गार्डचे आभारही व्यक्त…
