दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. राज्यात सेमी कंडक्टर तसेच इतर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. उद्योगांना मिळणारी सुविधा, पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य बनल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. इंडिया टुडे कॉनक्लेव्ह 2024 मध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे सहभागी झाले होते. यावेळी इंडिया टुडेचे संपादक राजदीप सरदेसाई व कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची विविध विषयांवर मुलाखत घेतली. दावोसमध्ये सुमारे पाच लाख कोटींची गुंतवणूक झाली. याशिवाय सौर ऊर्जा, सेमी कंडक्टर आदी क्षेत्रात राज्यात गुंतवणूक वाढत आहे. नुकतेच नवी मुंबईत सेमी कंडक्टरचा प्रकल्प…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. तसेच राऊत यांना न्यायालयाने दंड सुनावताना २५ हजार रुपये ही रक्कम मेधा यांना नुकसान म्हणून देण्याचेही आदेश दिले. मीरा भाईंदर येथील १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. मात्र बनावट कागदपत्रे सादर करून शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा यांच्यावर केला होता. त्यानंतर, मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा…
दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अंत्योदय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- निरीक्षक वैधमापन, गट-ब (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात आला आहे. या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support- online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क करावा असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले…
दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाची अंमलबजावणी या विषयावर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे (नागरी) 2.0 राज्य अभियान संचालक, नवनाथ वाठ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. याच धर्तीवर स्वच्छता हाच आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरंभ झालेले हे राज्यस्तरीय अभियान 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालणार असून राज्यातील…
दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच 22 हजार 600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करतील. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाच्या उद्घाटनामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत विभागाचा खर्च सुमारे 1 हजार 810 कोटी रुपये आहे. याशिवाय सुमारे 2,950 कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो फेज-1 च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह सुमारे…
दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यात शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महावाचन उत्सव’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर 2024 पर्यंत एक लाखांहून अधिक शाळांनी नोंदणी केली असून 42 लाख 84 हजारांहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले असल्याची माहिती, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 96.22 टक्के विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे. राज्यात 2023 मध्ये राबविण्यात आलेल्या महावाचन उत्सव उपक्रमामध्ये 66 हजार शाळांनी नोंदणी केली होती. त्या तुलनेत या वर्षी राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते बारावी मधील…
दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- केंद्र सरकारने प्रारंभिक बाल्यावस्था देखभाल आणि शिक्षणअंतर्गत सुरू केलेल्या ‘पोषण भी, पढाई भी’ या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना उत्तम पोषण,आहार आणि शिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पोषण जनजागृती संदर्भातील विविध उपक्रमात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल राहिला आहे, असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे ‘पोषण भी, पढाई भी’ या राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, एससीईआरटीचे…
दिनांक –२५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ग्रामपंचायतीच्या बाहेर उदरनिर्वाहासाठी गेलेल्या ग्रामस्थांसाठी ग्रामसभेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होण्याची संधी द्या अशी महाराष्ट्र राज्य रुग्ण हक्क परिषद चे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रत्यक्ष भेटून तर प्रधान सचिव एकनाथ डवले यांना ईमेल द्वारे लेखी निवेदन देऊन जोरदार मागणी केली आहे. यावेळी मुलाणी म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात 36 जिल्ह्यात 358 तालुक्यात एकूण 28813 ग्रामपंचायती आहेत. उक्त जिल्ह्यातील विविध गावांतील ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांना अनेकदा रोजगार किंवा उदरनिर्वाहाच्या आवश्यकतेमुळे आपल्या गावांपासून दूर 500 कि.मी. पेक्षा अधिक अंतरावर अन्य ठिकाणी वास्तव्यास जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना गावात नियमितरित्या होणाऱ्या ग्रामसभांमध्ये प्रत्यक्ष…
दिनांक –२५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्याचा समावेश असलेल्या व त्यांच्या साहित्याची समग्र समीक्षा असलेल्या ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाड्मय’च्या 18 खंडांचे प्रकाशन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. मराठी भाषेच्या अभ्यासक, साहित्यिक व विद्यार्थ्यांसाठी हा अनमोल खजिना अभ्यासासाठी उपलब्ध झाला असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी यावेळी दिली. मराठी विश्वकोश मंडळाचे पहिले अध्यक्ष, प्राच्यविद्यापंडित लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावरील ज्येष्ठ साहित्यिक व संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तयार केलेल्या ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाड्मय’च्या 18 खंडांच्या प्रकाशन प्रसंगी खंडाचे निर्माते व संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील,…