दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मंत्रालयातील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची एका अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आली. यावेळी तिने कार्यालयात तोडफोड करून एकच गोंधळ घातला. दरम्यान ही महिला कोण होती? याबद्दल आता तपास सुरु करण्यात आला आहे. मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सहाव्या मजल्यावर कार्यालय आहे. काल संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस करण्यात आली आहे. मंत्रालयातील कार्यालयात असणारी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची पाटी फेकून देत अज्ञात महिलेने पोबारा केला आहे. या…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कामांमुळे सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार असल्याने बळीराजा सुखावणार आहे. या प्रकल्पांची कामे गतीने व्हावीत यासाठी संबधित महामंडळांनी सूक्ष्म नियोजन करून त्याची गतीने अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या बैठकीस आमदार तथा महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी,…
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मात्यांना २९ कोटी २२ लाख रूपयांच्या धनादेशाचे वितरण दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- शासन नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटपाच्या कार्यक्रमात सह्याद्री अतिथीगृहात ते आज बोलत होते. मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मुंबई, कोल्हापूर प्रमाणे लवकरच नागपूरमध्ये सुद्धा 150 एकर जागेमध्ये फिल्म सिटी तयार करणार असून मराठी चित्रपट निर्मात्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी करणार आहे. राज्यात 75 नवीन चित्रनाट्य गृहे बनविण्यात येणार आहेत. तसेच नरिमन पाँईट येथे मराठी चित्रपटगृहे…
दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. आगामी काळात पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना तारांकित दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यावर पर्यटन विभागाचा भर असुन लवकरच विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी आहे. या दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळचा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे शुभारंभ केला. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, एमटीडीसीचे…
दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये नाविन्यपूर्ण नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी सहकार्य करण्यासाठी महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाप्रित) आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड एनजीईएल (NGEL) यांच्यात मुंबई येथे संयुक्त उपक्रम करार झाला आहे . या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट 10 गीगावॅट क्षमतेचे रिन्यूएबल एनर्जी पार्क आणि अक्षय ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येतील. जेणेकरून राज्याच्या ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार आहे. या संयुक्त उपक्रमाचा एक भाग म्हणून महाप्रित आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड विविध अक्षय ऊर्जा प्रकल्प जसे की ग्राउंड माउंटेड सोलर, फ्लोटिंग सोलर, बॅटरी एनर्जी स्टोरेज, हायब्रीड सोलर, ई. प्रकल्प विकसित करण्यासाठी एकत्र काम…
दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केले नाही त्यांनी नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क करून ई-केवायसी करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी…
दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने नवी मुंबईतील तळोजा येथे उभारण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या अॅडव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन २८ सप्टेंबरला डी.वाय.पाटील विद्यापीठ, नेरूळ येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण.आर. गवई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष संग्राम देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नवोदित वकिलांना कायद्याचे प्रशिक्षण देण्यासाठी तसेच कायदा विषयावर संशोधन व्हावे, यासाठी अॅडव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात येणार…
दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन मुंबई शहर सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ५८ आयोजित करण्यात आला आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षणासह निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील…
दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे रात्री ८ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय जाधव उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यास, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग,…
दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) आपल्या स्टुडण्ट कार प्रोजेक्टच्या माध्यमातून सरकारच्या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाप्रती कटिबद्ध आहे. या वर्षी, मेकट्रॉनिक्स विद्यार्थ्यांनी फोक्सवॅगन टायगुन एसयूव्ही आणि फोक्सवॅगन व्हर्टस सेदानला एकत्र करत नाविन्यपूर्ण पिकअप ट्रक डिझाइन केला आहे. कार संकल्पनेला अंतिम रूप देणे, संकल्पनांचा संग्रह, बाजारपेठ विश्लेषण, संशोधनव विकास, खरेदी, पॅकिंग आणि नऊ महिन्यांहून अधिक कालावधीमध्ये लाँचसाठी अंतिम कार टेस्टिंग अशा विविध टप्प्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध पार्टस् डिझाइन व ३डी-प्रिंटींग केले, ज्यामधून डिझाइनमधील आव्हानांचे निराकरण करण्यासाठी अत्याधुनिक उत्पादन तंत्रांचा वापर करण्याबाबत त्यांच्या क्षमतेला दाखवले. त्यांनी वेईकलला अंडरबॉडी प्रोटेक्शन, स्टडेड टायर्स, अॅम्बियण्ट…