दिनांक –०५/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यातील लहान जलविद्युत प्रकल्पांचे व सहःस्थित सौर ऊर्जा प्रकल्पांचे खाजगीकरणातून बांधा, वापरा व हस्तांतरण करा (BOT) तत्वावर विकास करण्याच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वीच्या लहान जलविद्युत प्रकल्पांचे खाजगीकरणातून विकासाच्या धोरणांतर्गत १६३.६५ मे. वॅ. क्षमतेचे एकूण ४२ जलविद्युत प्रकल्पांची उभारणी करण्यात आलेली आहे. हे धोरण सुधारित करण्याची गरज होती. त्यानुसार प्रवर्तकाने स्वतः शोधलेल्या जलविद्युत प्रकल्पांचा थेट विकसनाचा पर्याय या नव्या धोरणात उपलब्ध असेल. शासन संकेतस्थळावरील १०१.३९ मे. वॅ. क्षमतेच्या ३७ जलविद्युत प्रकल्पांच्या विकसनाकरिता पारदर्शक निविदा पद्धतीचा अवलंब करुन प्रवर्तकाची निवड करण्यात येईल. ज्या प्रकल्पांकरिता…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –०५/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ-एमएसआरडीसीमार्फत पुणे शहराभोवती बांधण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या कामास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुणे रिंग रोडच्या पूर्व भागात ऊर्से ते सोलू ते सोरतापवाडी (पुणे-सोलापूर रस्ता) या रस्त्याच्या १९ हजार ९३२ कोटी ९८ लाख रुपये इतक्या किंमतीच्या कामांना, तसेच पुणे रिंग रोड पश्चिम भागात ऊर्से ते वरवे (बु.) सातारा रोडसाठी २२ हजार ७७८ कोटी ५ लाख इतक्या किंमतीच्या कामांना सुधारित मान्यता देण्यात आली.
दिनांक –०५/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शनासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ योजना’ सुरु करण्यात आली आहे. तीर्थयात्रा अध्यात्मिक मानसिक समाधानाची बाब आहे. कोल्हापूर, जळगाव नंतर तीर्थदर्शनासाठी तिसरी ट्रेन मुंबईतून आज रवाना होत आहे. योजनेअंतर्गत सर्व जिल्ह्यातून तीर्थ दर्शनासाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्र दर्शनातून अध्यात्मिक व मानसिक समाधानाची पर्वणी ज्येष्ठ नागरिकांना मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संदेशामधून केले. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी विशेष ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून आज रवाना झाले. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विशेष ट्रेनला हिरवा…
दिनांक –०५/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्रीगण या बैठकीस उपस्थित होते. तीन ऑक्टोबर हा दिवस यापुढे ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला. यात म्हटले आहे की, या ऐतिहासिक निर्णयाबद्धल राज्य मंत्रिमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार व्यक्त करते, तसेच राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने…
दिनांक –०५/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, वाशिम आणि ठाणे येथे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. प्रधानमंत्री सकाळी 11.15 वाजता वाशिममधील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील आणि संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहतील. प्रधानमंत्री यांचे वाशिम मधील कार्यक्रम वाशिममध्ये प्रधानमंत्री 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील. या योजनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता वितरित केला जाणार असून, यामुळे सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे 1,920…
दिनांक –०५/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधली आघाडीची कंपनी असलेल्या झेलियो ईबाइक्सने एक आकर्षक, लक्षवेधी रूपासह डिझाइन केलेले, सुधारित ईवा झेडएक्स+ मॉडेल लॉन्च केले आहे. ज्यामध्ये ईवा आणि ईवा एको, नवीन ईवा झेडएक्स+ सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे असा लोकप्रिय ईवा सीरीजचा भाग हा, विद्यार्थी, व्यावसायिक आणि हंगामी कामगार यांच्यासह आधुनिक शहरी प्रवाशांसाठी तयार करण्यात आला आहे, ज्यात शैली आणि कार्यक्षमतेच्या संयोजनाचा शोध घेण्यात आला आहे. नव्याने पुन्हा डिझाईन केलेली ईवा झेडएक्स+, एक अशा प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरचा अनुभव देते, जी २५ किमी/तासच्या टॉप स्पीड आणि एका चार्जवर १०० किमी पर्यंत प्रभावीरेंज सह, फॅशनेबल तितकीच कार्यक्षम आहे. ही…
दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सर्वत्र नवरात्र महोत्सव सुरू झाला असून पाचोरा शहरात विविध मंडळांच्या वतीने गरबा दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आज दि.३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले लखन वाधवाणी नामक युवकाचा एका कार्यक्रमात गरबा खेळत असतांना अचानक चक्कर आल्याने सदर युवक जमिनीवर खाली अचानक पडल्याने तात्काळ काही सहकाऱ्यांच्या मदतीने पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु सदर इसमाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सिंधी कॉलनी येथील अतिशय गरीब कुटुंबातील रमेश वादवाणी यांचा हा मुलगा होता सदर लखन याचे वय…
दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून मुंबई येथील मुख्य शाखा आणि वांद्रे शाखा अशी मिळून एकूण १७६ पैकी ३७ प्रकरणे निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे. लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल आणेकर व अतिरिक्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ए. एस. खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम यशस्वी झाले. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. एस. देशपांडे, न्यायाधीश, पी. के. खराटे आणि ए. जे. फटाले, वकील प्रतिक्षा विचारे, मदनेश व्ही. सिंग यांनी काम पाहिले. या लोकअदालतचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक…
दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या घेत आंदोलन सुरु केल्याची बातमी समोर आली आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आमदारांनी आज मंत्रालयात प्रवेश करत तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर मारल्या उड्या आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याही समावेश आहे. हा प्रकार लक्ष्यात घेता मंत्रालयातील पोलिसांनी धाव घेत आंदोलनकर्त्या आमदारांना जाळीतून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र नरहरी झिरवळ यांचा रक्त दाब वाढला होता. मंत्रालयात या पूर्वी अनेक सर्वसामान्य नागरिकांनी आपली काम न झाल्याने वैतागून उड्या मारल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आज चक्क…
दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना…