दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात दिले. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आभार मेळावा व सत्कार समारंभ समृद्धी लॉन्स, हर्सूल सावंगी रोड येथे आयोजित करण्यात आला होता. पोलीस पाटीलांचे मानधन शासनाने 15 हजार रुपये केले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार पोलीस पाटील संघटनेने व्यक्त केले. या मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार,शहर व औद्योगिक…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भगवान गौतम बुद्धांच्या पाली भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल भिख्खू संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार..! विश्वातील सर्वात पुरातन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या पाली भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मुंबईतील बीकेसी येथे ऑल इंडिया भिख्खू संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंचशीलाचा गमचा घालून व गौतम बुद्धांची प्रतिमा देऊन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी भिख्खू संघासोबत त्यांनी बुद्ध वंदना कथन केली. भिख्खू संघाबरोबर संवाद साधताना मोदीजी म्हणाले की, पाली भाषेचा बुद्ध धर्मासोबत खूपच घट्ट नातं आहे. येत्या काळात अधिकाधिक तरूण पिढी पाली भाषेविषयी ज्ञान मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी…
दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई आणि परिसरातील शहरांमधील सातारकरांचा भव्य दसरा मेळावा गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथी महंत स. भ.मोहनबुवा रामदासी,विजयजी शिर्के , शिर्के ग्रुप,कायदेतज्ज्ञ ऍड.उदयजी वारुंजीकर,हास्यसम्राट भाऊ कदम तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सातारा रत्न आणि सातारा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. हे पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर असे राजकीय रत्न – श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, कला रत्न – राहुल भंडारे, कामगार…
दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जय महाराष्ट्र सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा धारावी येथील नवरात्रौत्सवातील यंदाचा बद्रीनाथ मंदिराचा देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरला आहे. उत्तराखंड राज्यातील या मंदिराची प्रतिकृती हुबेहूब साकारली गेली आहे. त्यासाठी अनेक सूक्ष्म बाबींवर विशेष काम करण्यात आले आहे. या देखाव्यासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. बद्रीनाथ मंदिराची ही प्रतिकृती ३० फूट उंच आणि ७० फूट रुंद आहे. चार धाम पैकी हे एक मंदिर असल्यामुळे भाविकांची एकच गर्दी होत आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरेश सावंत यांच्यासमवेत सचिव रामचंद्र महाडेश्वर, कार्याध्य़क्ष बबनराव घाग आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करण्याची मंडळाची…
दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ५१ वी राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कॅडेट गटाच्या सामन्यांमध्ये बहारदार खेळी करत क्रीडा प्रबोधिनीच्या स्वराज लाड, साक्षी कांबळे, ठाण्याच्या तेजस चव्हाण, संभाजीनगरच्या संस्कार मुसळे, कोल्हापूरच्या पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईच्या विहान कोटीयान यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवत सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या गटात यवतमाळची स्नेहल ढोरे आणि क्रीडा प्रबोधिनीच्या साक्षी कांबळे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवले. शिओ तोशी या डावाने पीजेएच्या वृंदा शेलार हिला यवतमाळची स्नेहल ढोरे हिने आस्मान दाखवले तर क्रीडा प्रबोधिनीच्या साक्षी कांबळे हिने योको गाके डावाचा योग्य वेळेत परिणामकारक वापर करून संभाजीनगरच्या श्रुतकिर्ती खलाटे हिला अंतिम चरणात हरवले. सातार्याच्या…
दिनांक –०५/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज: एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार अनिल महाजन यांनी नागरिकांना काय केले आवाहन सविस्तर बघा. एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार अनिल महाजन यांनी आपली उमेदवारी अंतिमच आहे असे सूतोवाच केले आहे. कुठल्याही परिस्थितीत आमदारकी लढवणारच आहे. सविस्तर बघा नागरिकांना काय केले आवाहन.
दिनांक –०५/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-: जैश-संबंधित दहशतवादी कटाच्या चालू तपासाचा एक भाग म्हणून, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आज जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्ली या पाच राज्यांमधील 22 ठिकाणांवर समन्वित छापे टाकले. प्राथमिक अहवालानुसार एनआयएने दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अनेकांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर, जालना आणि मालेगाव येथे छापे टाकून चार जणांना ताब्यात घेण्यात आले.
दिनांक –०५/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडीतील एका गोदामाला भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील एका गोदामाला शनिवारी (५ ऑक्टोबर) पहाटे भीषण आग लागली. स्थानिक वृत्तानुसार हे गोदाम भिवंडी बायपासजवळ आहे आणि व्ही-लॉजिस या लॉजिस्टिक कंपनीच्या मालकीचे आहे. गोदामाला लागलेल्या आगीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर वायरल झाला आहे कोणत्याही मृत्यूचे किंवा जखमींचे कोणतेही तात्काळ वृत्त नाही. हे गोदाम मुंबई-नाशिक रोडवर असल्याची माहिती आहे. आगीचे कारण लगेच स्पष्ट होऊ शकले नाही. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे अनेक कारखाने आणि गोदामे असलेले एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे. हे शहर प्रामुख्याने हातमाग केंद्र म्हणून ओळखले जाते
दिनांक –०५/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नाशिक जिल्ह्यातील नामपूर येथील हिरा हॉस्पिटलचे संचालक व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सी. एन. पाटील, जिप सदस्या सुनीता पाटील यांच्या डॉक्टर मुलाचा आणि डॉक्टर जावयाचा एकाचा दिवशी मृत्यू झाला आहे. या दोघांवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची वेळ या दाम्पत्यावर आली आहे. या घटनेने नाशिकवर शोककळा पसरली आहे. डॉ. सी. एन. पाटील यांचा मुलगा डॉ. आदित्य चिंतामण पाटील याने लातूर वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी घेतली होती. तो वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता. सुमारे 20 दिवसांपूर्वी त्याला काविळची लागण झाली होती. आदित्यला उपचारासाठी आधी मालेगावला त्यानंतर नाशिकला नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला…
दिनांक –०५/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यातील सर्व ऊसतोड, वाहतूक कामगार व मुकादमांना झोपडी व बैल जोडी करिता विमा संरक्षण देण्यासाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. साखर कारखान्यांकडून ऊस गाळपावर प्रतिवर्षी प्रति मेट्रीक टन दहा रुपयांप्रमाणे मिळणाऱ्या निधीतून या विमा योजनेसाठी खर्च करण्यात येईल. दि न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी ही यासाठी विमा कंपनी असेल.