दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे. याकरिता 181 मतमोजणी पर्यवेक्षक, 204 मतमोजणी सहाय्यक, 165 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, 183 इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2), 986 इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3), 734 चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशी एकूण 2 हजार 453 अधिकारी, कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 188-पनवेल अे.आर.कालसेकर पॉलिटेक्नीक कॉलेज,पनवेल, ठाणा नाका जवळ, कर्नाळा स्पोटर्स ॲकेडमी समोर, पनवेल येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 24 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 25 आहे. मतमोजणी पर्यवेक्षक 38, मतमोजणी सहाय्यक 38, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक 38, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2) 45, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3) 310, चतुर्थ…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने आज ऑस्ट्रेलिया-स्थित सर्वसमावेशक शिक्षण सेवा प्रदाता प्लॅनेट एज्युकेशन ऑस्ट्रेलिया पीटीवाय लि.च्या संपादनाला मान्यता मिळाल्याची घोषणा केली, जेथे ४९ टक्के देय भरलेल्या शेअर भांडवालाची धोरणात्मक गुंतवणूक करण्यात आली आहे. ही धोरणात्मक गुंतवणूक इझमायट्रिपच्या आंतरराष्ट्रीय स्टडी टुरिझममधील प्रवेशाला सादर करते आणि पर्यटन क्षेत्रातील त्यांच्या स्थानाला अधिक दृढ करते. १९९९ मध्ये स्थापना करण्यात आलेल्या प्लॅनेट एज्युकेशनने आघाडीची शिक्षण सेवा प्रदाता म्हणून स्वत:चा दर्जा स्थापित केला आहे, तसेच उद्योगामध्ये २५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. कंपनी परेदशात शिक्षण घेण्याच्या सर्वसमावेशक सेवा देते, ज्यामध्ये तज्ञांसोबत समुपदेशन, युनिव्हर्सिटी प्लेसमेंट्स…
दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाजवळ (एमआयडीसी) कारखान्याला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावरील व्हिज्युअलमध्ये कारखान्यातून धुराचे प्रचंड लोट उठत असल्याचे दिसून आले. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.
दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- फेडरल एक्सप्रेस कार्पोरेशन या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीने धोरणात्मक विस्तार करत दक्षिण भारताची एशिया-पॅसिफिक प्रांतातील महत्त्वाच्या इंपोर्ट्सपर्यंतची पोहोच वाढवली आहे आणि युरोप आणि US मधील निर्यातीस प्रोत्साहन दिले आहे. या नवीन उड्डाण सेवा लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळ्या इष्टतम करतील, जागतिक व्यापारात दक्षिण भारताची भूमिका सशक्त करतील, ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्याची फेडएक्सची वचनबद्धता बळकट करतील आणि जागतिक पुरवठा साखळीतील भारताच्या क्षमता खुल्या करतील. चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, इंटरनॅशनल आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, एअरलाइन फेडएक्स श्री. रिचर्ड डब्ल्यू. स्मिथ म्हणाले, “आज भारत ही जगातील एक अत्यंत रोमांचक आर्थिक विकास गाथा आहे आणि त्यामुळे फेडएक्ससाठी एक महत्त्वपूर्ण विकास बाजाराचे प्रतिनिधित्व करत आहे. या…
दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गांधी फिल्म्स फाउंडेशन आणि फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्टच्या वतीने कलाकार व विद्यार्थ्यांसाठी राजभवन मुंबई येथे मंगळवारी (दि. १९) एका चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कार्यशाळेला भेट दिली तसेच विद्यार्थी कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतींचे अवलोकन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला व कलाकार तसेच आयोजकांना कौतुकाची थाप दिली. या कार्यशाळेत सहभागी कलाकार व विद्यार्थ्यांनी राजभवनातील विविध ऐतिहासिक वास्तू व निसर्गाचे चित्रण केले. गांधी फिल्म्स फाउंडेशनचे कलाकार व क्युरेटर संजय निकम व ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधाकर ओलवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रात चार दशके राजकारण गाजवणाऱ्या बड्य नेत्याची राजकीय संन्यासाची घोषणा; व्हिडीओ आला समोर महाराष्ट्रातील राजकारणात चार दशकांपासून कार्यरत असलेले पूर्वीश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे. एकनाथ खडसे यांनी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच यावेळी भावनिक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल, असे म्हणत त्यांनी मुलगी रोहिणी खडसे हिला विजयी करण्याचे आवाहन केले.
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी, विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बीव्हीए आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. भाजपचे सरचिटणीस तावडे यांच्यावर प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी मतांच्या बदल्यात रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला आहे. राजन नाईक वसई तालुका विधानसभा उमेदवार भाजपा यांचा हॉटेल विवांता विरार येते विनोद तावडे आणि राजेंद्र नाईक यांचे चिरंजीव पैसे वाटप करत असताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलला घेराव घातला. या दरमान्य बीव्हीए आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यांच्या कार्यकर्त्यांमधील गोंधळाचा व्हिडिओ वायरल झाला आहे
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सोमवारी कश्मिरा शाहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्यासोबत झालेल्या अपघाताची माहिती दिली. काहीतरी मोठे घडणार होते, पण ते लहानच ठरले, असे ती म्हणाली. मात्र, त्याचे काय झाले हे त्याच्या पोस्टवरून स्पष्ट झाले नाही. आता तिचे पती कृष्णा अभिषेक यांनी हेल्थ अपडेट दिले आहे. काश्मिराचा अपघात भारतात नाही तर अमेरिकेतील पाम स्प्रिंग्समध्ये झाला. स्क्रीनशी संवाद साधताना कृष्णा म्हणाला, “हा एक मोठा अपघात होता. ती मॉलमध्ये होती आणि अचानक आरशाला धडकली. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती हॉस्पिटलमध्ये गेली आणि आता सुरक्षित आहे.” कृष्णा पुढे म्हणाला, “तिची सुरक्षा माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची…
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मेघना साने यांना ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा विशेष पुरस्कार त्यांच्या ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकासाठी घोषित झाला आहे. मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात हा पुरस्कार त्यांनी सुप्रसिद्ध लेखक डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक व अध्यक्षा नमिता कीर उपस्थित होत्या. परदेशात स्थापन झालेल्या मराठी शाळा, त्यांच्या अभ्यासक्रमाची निर्मिती, तिथे शिकवले जाणारे विषय, मराठी शिक्षणाचे तेथे असलेले महत्त्व याचा अभ्यास करून मेघना साने यांनी ‘मराठी सातासमुद्रापार’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला अनुराधा नेरूरकर यांनी प्रस्तावना लिहीली आहे. सतीश…
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे (शरद गट) नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघात हल्ला झाला. अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याने अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले. अनिल देशमुख यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसत आहे. त्यांनी आपले डोके टॉवेलने बांधले आहे. या हल्ल्याचा निषेध करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात माजी गृहमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचं राज्य आहे, असा प्रश्न निर्माण होतो. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील हे काटोल…