दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा हे कर्नाटक व देशाच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. उच्च विद्याविभूषित असलेले एस एम कृष्णा एक अनुभवी संसदपटू होते. बॅरिस्टर नाथ पै यांच्या प्रजा समाजवादी पक्षातर्फे ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांनी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष, कर्नाटकचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल व केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले. साहित्य, टेनिस व शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्या कृष्णा यांनी राजभवन येथे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यपाल पदाची…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अनधिकृत अतिक्रमणाचा विळखा पाचोरा शहरात अतिक्रमण जागेवर ठेवलेल्या टपऱ्या वरती बेक़ायदेशीर सट्याची पाने लिहले जात आहे. पाचोरा नगरपालिका प्रशासनाने ताबडतोब सदर टपऱ्या उचलून सदर जागा सील करावे कोणी सील तोडल्यास मोठा दंड आकारण्यात यावा. पाचोरा शहरात परसलेली ही घाण दूर करावी. शहरातील सर्व मुख्य चौक आणि बाजार पेठ मधील अनाधिकृतपणे सट्टा सुरु असणाऱ्या टपऱ्या शोधून ताबडतोब नगरपालिका मार्फत उचलण्यात याव्या पाचोरा येथील कर्तव्यदक्ष न.पा मुख्यअधिकारी स्थानिक प्रशासन यांनी तात्काळ लक्ष घालावे अन्यथा सर्व टपऱ्या वरील प्रकार नगरविकास सचिव आणि जिल्हाधिकारी जळगाव यांना लाइव्ह पाठवण्यात येईल. पाचोरा शहरातील अतिक्रमण मध्ये अवैध धंदे सट्टा पत्ता…
दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यामुळेच चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी हल्ला करणार्या दोघांना अटक केल्यानंतर हल्लामागील कारण स्पष्ट झाले. रेवण तानाजी लगस (वय २०, रा. गोकुळनगर, कात्रज), प्राणजित अच्युत शिंदे (वय २४, रा. हांडेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रकांत टिंगरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. माजी नगरसेविका रेखा टिंगरे व चंद्रकांत टिंगरे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस…
दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- उल्हासनगर शहरात बंदी असलेल्या गुटख्याचा धंदा सर्रास सुरू आहे. शहरातील अनेक गुटखा माफिया शहरात सक्रिय असून गुजरातसह देशाच्या कानाकोपऱ्यातून बंदी असलेला गुटखा शहरात आणतात. अशा स्थितीत विठ्ठलवाडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन गुटखा तस्करांना अटक करून गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गुटख्याच्या तस्करांना पकडले, त्यात 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुटखा आणि फ्लेवरयुक्त तंबाखू जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने…
दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सांगलीच्या जत तालुक्यातील एका गावामध्ये पुष्पा 2 पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सर्वच सिनेमागृह हाऊसफुल झाला होता. पण चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. थिएटर हाऊसफुल्ल झाल्याने तिकीट बुकिंग बंद करण्यात आले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. काहींनी केबिनवर दगडफेक ही केली. मात्र तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोहचले आणि वातावरण शांत करण्यात आले.
दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल सावे, संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, सचिव प्रवीण पुरो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते. देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य राहील यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करून विकासाचा वेग वाढविण्यात येईल. मागील अडीच वर्षांत राज्य शासनाने घेतलेले…
दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज :- राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले. आजच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य व…
दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज :- कल्पना करा की तुम्हाला त्वचेची देखभाल करून १ लाख रुपयांची कमाई करण्याची संधी मिळते आहे. त्वचेच्या देखभालीची नव्याने सुरुवात करत असलेल्यांसाठीचा विज्ञानावर आधारित अग्रगण्य ब्रॅण्ड, डिकन्स्ट्रक्टने “स्किनकेअर इंटर्नशिप” नावाची एक आगळीवेगळी मोहीम सुरू केली आहे. एक नवी वाट निर्माण करू पाहणाऱ्या या उपक्रमाची रचनाच मुळी स्किनकेअरच्या बाबतीत नवख्या मंडळींना स्किनकेअरच्या संकल्पनेचा शोध घेता यावा, ती आजमावता यावी यादृष्टीने करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला स्किनकेअरचा प्रवास सुरू करण्यासाठी सक्षम बनविण्याप्रती डिकन्स्ट्रक्टने जपलेल्या बांधिलकीचा भक्कम पाया या मोहिमेला लाभला आहे. ही इंटर्नशिप १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींसाठी खुली आहे व त्यासाठी स्किनकेअरच्या कोणत्याही पूर्वज्ञानाची…
दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज :- महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत· ५३ वर्षीय महिला रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील अतिविशेषोपचार रुग्णालयातील हृदयरोगशास्त्र विभागात अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सेवा सुरु करण्यात आली आहे. ०५ डिसेंबर २०२४ रोजी एका ५३ वर्षीय महिला रुग्णांवर हृदयरोगशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संतोष कवठाळे यांनी या संस्थेच्या अतिविशेषोपचार रुग्णालयातील पहिली अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी (दोन स्टेन्ट बसवून) यशस्वीरित्या पूर्ण केली. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय एस. मोहिते व अतिविशेषोपचार रुगणालयाचे विशेषकार्य अधिकारी डॉ. सुनिल होळीकर यांनी मागील एक वर्षापासून लातूर अतिविशेषोपचार रुगणालय येथे हृदयरोगशास्त्र विभागाचे कॅथलॅब…
