दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- रायगड जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम सोहळा सोमवार दि. 09 डिसेंबर 2024 रोजी सकाळी  11.00 वाजता राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे  जिल्हाधिकारी व अध्यक्ष किशन  जावळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार  असून      या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व कार्यालये/संस्थांचे कार्यालय प्रमुख, कर्मचारी व नागरीकांनी  ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ सोहळयास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) यांनी केले  आहे.

Share.