दिनांक –०५/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी ( मुंबई केंद्र २ ) मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, चर्नीरोड, मुंबई येथे सुरू होत आहे. दिनांक ६ ते १८ डिसेंबरच्या दरम्यान ह्या स्पर्धा होतील. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण १७ संघांचा सहभाग आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.
Breaking
- शेतकऱ्यांसाठी सढळ हात, शाल-हारांना नकार! — प्रदीप गरड यांचा आदर्शवत वाढदिवस उपक्रम
- पाचोरा तालुक्यात विना नंबर प्लेट्सच्या वाहनांचा सर्रास वापर पोलीस प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी.
- दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचे जीवन वाहिनी अर्थात मुबंई लोकल मध्ये मोठ्या उत्साहात दसरा साजरा करण्यात आला.
- रेल्वेत नोकरीच्या आमिषाने अनेक बेरोजगारांची फसवणूक करणारा भामटा योगेश साळोखे गजाआड.
- भारतीय जनता पार्टीचे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आगामी राजकीय गणित असे असणार का?
- सावधान! सावधान! गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या नावाचा अज्ञाता कडून गैरवापर होत आहे याबाबत.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय बालक तेजस महाजन हत्या प्रकरणी महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक
- भिवंडी महानगरपालिका पाणीपुरवठा अभियंता श्री संदीप पटनावर यांची नगरविकास मंत्रालयात चौकशी सुरू.