दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभेमध्ये आपले म्हणणे मुद्देसूदपणे तसेच संसदिय पद्धतीने पण प्रभावी पणे मांडणाऱ्या आमदरांपैकी पराग अळवणी एक असल्याने त्यांना सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाला असे उद्गार विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी काढले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल, लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले तर्फे आयोजित, पराग अळवणी यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.एक अभ्यासू आमदार निवडून दिल्याबद्दल त्यांनी पार्लेकरांचे आभार मानले.
विधानसभा हे अत्यंत प्रभावी व्यासपीठ असून तेथे प्रश्न धसास लावता येतात याची अनेक उदाहरणे देत, मतदारसंघाच्या तसेच मुंबईच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला असे प्रतिपादन आमदार पराग अळवणी यांनी केले.एखादा प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्याचा असल्यास तो विविध मार्गांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न करायचा, कधी ना कधी बोलायची संधी मिळतेच असे त्यांनी सांगितले. उदाहरणार्थ, विमानतळ फनेल झोन मधील इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न ४२ वेळा तारांकित प्रश्न,लक्षवेधी,प्रस्ताव,ठराव,विधेयकावरील चर्चा द्वारे मांडण्याचा प्रयत्न केला तर १२ वेळा प्रत्यक्ष बोलायला मिळाले.
यानिमित्ताने, पराग अळवणी यांच्या विधानसभा अधिवेशनातील कार्याचा अहवाल राहुल नार्वेकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला.या अहवालाचे वैशिष्ट्य असे की QR कोड च्या माध्यमातून विधानसभेतील सुमारे १२५ भाषणांचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत.
लोकप्रतिनिधींनी बदल घडवून आणणे महत्वाचे असते आणि त्यासाठी त्यांच्या कडून प्रभावी काम होते तेव्हा लोकांनी त्यांचे कौतुक केले पाहिजे या भावनेतून संस्थेने हा सत्कार सोहळा आयोजित केला असे लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे यांनी सांगितले.
Breaking
- पुणे धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागरांचा मेरिटवर पारदर्शक कारभार!
- पाचोरा शहरातील अवैध धंद्याच्या टपऱ्याचे अतिक्रमण काढले. “कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे” – श्री.मंगेश देवरे ,पाचोरा नगरपरिषद मुख्यअधिकारी.
- अवैधधंदे सट्टाच्या टपऱ्याचे अतिक्रमण पाचोरा शहरात मोठ्या प्रमाणात न .पा. अधिकारी कुंभ करणाच्या गाड़ झोपेत.
- वडिलांनी हाकलून दिले, एका वर्षात घटस्फोट, संपूर्ण कारकिर्दीत फक्त 2 हिट्स सिनेमे; तरीही अभिनेत्रीचं नेटवर्थ 170 करोड
- ‘आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर 48 तासात कारवाई करा’; रुपाली चाकणकरांचे आदेश
- विठाई प्रतिष्ठान (रजि) आयोजित सार्वजनिक माघी गणेशोत्सव २०२५
- वाडा तालुक्यात टायर जाळणाऱ्या अवैध कंपनीत स्फोट झाला यात पाच लोक गंभीर जखमी तर दोन बालक मयत झाले आहेत.
- नोकरीवरून काढले म्हणून कर्मचाऱ्याने ऑफिसच्या गेटवरच केली काळी जादू