दिनांक –०८/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरीता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला माता-भागिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या वचन पूर्ती जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे बुधवार, दि.9 ऑक्टोबर 2024 रोजी मोर्बा,ता.माणगाव येथे स. 11 वा आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे, यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी केले आहे.

Share.