दिनांक – ०२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- इनोटेरा या अल्‍पभूधारक कृषी अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍यासोबत आरोग्‍यदायी खाद्य पुरवठ्याची खात्री घेण्‍यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या स्विस-इंडियन अन्‍न व तंत्रज्ञान प्‍लटॅफार्म कंपनीने त्‍यांची उपकंपनी मिल्‍कलेनच्‍या आयुष कॅटल फीड व्‍यवसाय लाइनच्‍या विस्‍तारीकरणाची घोषणा केली आहे. पशु खाद्य उद्योगामध्‍ये प्रबळ उपस्थितीसह इनोटेरा आता प्रीमियम विभागाच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आपली उत्‍पादन लाइन विस्‍तारित करत आहे. या धोरणात्‍मक पुढाकाराचा भाग म्‍हणून ब्रँड प्रीमियम बाजारपेठेवर लक्ष्‍य करत आयुष सुप्रीम आणि आयुष वर्धन हे दोन नसीन एसकेयू लाँच करत आहे.

ही नवीन प्रीमियम उत्‍पादने आयुष सुप्रीम आणि आयुष वर्धनमध्‍ये अनुक्रमे २२ टक्‍के व २४ टक्‍के क्रूड प्रोटीन आहे. ही उत्‍पादने किफायतशीर दरांमध्‍ये उच्‍च दर्जाचे पोषण देतात. प्रखर आरअँडीच्‍या माध्‍यमातून विकसित करण्‍यात आलेल्‍या खाद्यामध्‍ये बायपास फॅट, प्रोटीन, यीस्‍ट, एन्‍झाइम्‍स, व्हिटॅमिन्‍स व मिनरल्‍स संपन्‍न प्रमाणात आहेत, ज्‍यामधून दूधाचा दर्जा आणि एकूण गुरांचे आरोग्‍यामध्‍ये मोठी सुधारणा होण्‍याची खात्री मिळते. सध्‍या मिल्‍कलेनचे आयुष कॅटल फीड १०,००० हून अधिक शेतकरी, २५० हून अधिक रिटेलर्स आणि ५० हून अधिक वितरकांच्‍या प्रबळ नेटवर्कसह काम करते. ही आकडेवारी आर्थिक वर्ष २४-२५ मध्‍ये दुप्‍पट होण्‍याची अपेक्षा आहे. सध्‍या महाराष्‍ट्र व तामिळनाडूमध्‍ये दोन सक्रिय ऑटोमेटेड प्‍लांट्ससह कार्यरत असलेल्‍या मिल्‍कलेनचा आर्थिक वर्ष २०२५ च्‍या अखेरपर्यंत दोन नवीन प्‍लांट्स सुरू करण्‍याचा मनसुबा आहे.

इनोटेराच्‍या भारतातील व्‍यवसायाचे प्रमुख अविनाश काशीनाथन म्‍हणाले, ”आमच्‍या मिल्‍कलेनच्‍या आयुष कॅटल फीड व्‍यवसाय लाइनचे प्रीमियम विभागातील विस्‍तारीकरणामधून पशु पोषणामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याप्रती, तसेच भारतभरातील शेतकऱ्यांच्‍या उदरनिर्वाहामध्‍ये वाढ करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आयुष सुप्रीम व आयुष वर्धन या नवीन ऑफरिंग्‍जचे लाँच किफायतशीर दरामध्‍ये उच्‍च दर्जाचे आणि शाश्‍वत उत्‍पादने वितरित करण्‍यासाठी तंत्रज्ञान व पारंपारिक कौशल्‍यांना एकत्रित करण्‍याप्रती आमच्‍या सातत्‍यपूर्ण प्रवासामधील आणखी एक महत्त्वाचा टप्‍पा आहे. दोन नवीन उत्‍पादन प्‍लांट्सच्‍या लाँचचे नियोजन आणि आक्रमक विस्‍तारीकरण धोरणासह आम्‍ही आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत शेतकरी, रिटेलर्स व वितरकांचे आमचे नेटवर्क दुप्‍पट करण्‍यास सज्‍ज आहोत. हे विस्‍तारीकरण उच्‍च दर्जाच्‍या पशु खाद्याप्रती वाढत्‍या मागणीची पूर्तता करेल, तसेच अल्‍पभूधारक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्‍यासाठी, दूध उत्‍पन्‍न वाढवण्‍यासाठी आणि देशभरातील आरोग्‍यदायी अन्‍न पुरवठा साखळीप्रती योगदान देण्‍यासाठी आमच्‍या मिशनला अधिक दृढ देखील करेल.”

Share.