दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भगवान गौतम बुद्धांच्या पाली भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल भिख्खू संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार..!

विश्वातील सर्वात पुरातन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या पाली भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मुंबईतील बीकेसी येथे ऑल इंडिया भिख्खू संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंचशीलाचा गमचा घालून व गौतम बुद्धांची प्रतिमा देऊन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी भिख्खू संघासोबत त्यांनी बुद्ध वंदना कथन केली. भिख्खू संघाबरोबर संवाद साधताना मोदीजी म्हणाले की, पाली भाषेचा बुद्ध धर्मासोबत खूपच घट्ट नातं आहे. येत्या काळात अधिकाधिक तरूण पिढी पाली भाषेविषयी ज्ञान मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी मंत्री, मा. आमदार विजय (भाई) गिरकर, ऑल इंडिया भिख्खू संघाचे अध्यक्ष भदंत राहुल बोधी महाथेरो, मुंबई चे अध्यक्ष भदंत शांतीरत्न महाथेरो, भदंत राबसेल लामा, भदंत बिमल चकमा, भदंत संतोष चकमा उपस्थित होते.

Share.