दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून अनिल महाजन यांचा एरंडोल पारोळा मतदार संघात दौरा.
विकासापासून दुर्लक्षित झालेला मतदारसंघ एरंडोल-पारोळा या मतदारसंघात नव्याने विकास कामे करण्यासाठी आगामी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून इच्छुक उमेदवार अनिलभाऊ महाजन यांचा परिचय दौरा सुरू होत आहे.
प्रत्येक गावात जाऊन सर्व नागरिकांशी ओळख परिचय करणार आहेत. तसेच यावेळी दोन्ही तालुक्यांमध्ये पत्रकार परिषद घेऊन आगामी वाटचाली बाबत ते आपले भूमिका जाहीर करणार आहेत. नवतरुण युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी काम करणार आहेत.
या परिचय संवाद दौऱ्यादरम्यान सर्वांच्या भेटी घेणे काही नवीन लोकांशी ओळख परिचय करणे. एरंडोल-पारोळा मतदार संघात मी का ? इच्छुक आहे याबाबत सर्वसामान्य नागरिकांना पटवून देणे. हे प्रथम दौऱ्यात होणार आहे. तसेच ज्या-ज्या कार्यकर्त्यांना अनिलभाऊ महाजन यांची भेट घ्यायची आहे त्यांनी, खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर डायरेक्ट संपर्क करून भेटीची वेळ ठरवावी. प्रत्येकाने आपले नाव, गाव, भेटीचे ठिकाण ठरवून भेटीगाठीची व्यवस्था करावी हि विनंती.
अनिलभाऊ महाजन.
मोबाईल क्रमांक – 8788964050