दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सरकार आणि नागरिकांसाठीची जागतिक स्तरावरील अग्रगण्य तंत्रज्ञानासिद्ध सेवा भागीदार संस्था बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड (“बीएलएस”)ने १५ हून अधिक देशांमध्ये निवास व नागरिकत्व मिळविण्यासाठीच्या जलद-गती गुंतवणूक कार्यक्रमामध्ये विशेषीकृत सेवा पुरविणारी दुबई-स्थित सल्लागार संस्था सिटीझनशिप इन्व्हेस्ट (सीआय)चे १०० टक्के भागभांडवल संपादित करण्यासाठी अंतिम करारावर स्वाक्षऱ्या केल्याची घोषणा आज केली. या १०० टक्के भागभांडवलाच्या संपादनाचे मूल्य ३१.० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (~रु. २६० कोटी) आहे व या व्यवहाराला अंतर्गत जमेतून निधीपुरवठा करण्यात येणार आहे. सर्व आवश्यक मान्यता प्राप्त झाल्यावर हा व्यवहार ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे जॉइंट मॅनेजिंग डिरेक्टर श्री. शिखर अग्रवाल म्हणाले, “नागरिकत्व आणि निवास कार्यक्रमांच्या माध्यमातून दीर्घकालीन व्हिसासाठीच्या अर्जांवर प्रक्रिया करण्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सिटीझनशिप इन्व्हेस्टच्या संपादनाची घोषणा करताना आम्ही अत्यंत उत्साहित आहोत. या संपादनामुळे व्हिसा व कॉन्स्युलर क्षेत्रातील आपल्या सेवांची कक्षा रुंदावण्याप्रती आमची कटिबद्धता अधोरेखित झाली आहे व अशाप्रकारच्या सहयोगात्मक कार्यक्रमांना चालना देण्याच्या आणि ईबीआयटीडीएमध्ये वाढ करण्याच्या आमच्या धोरणात्मक दृष्टीकोनाशी हे पाऊल मेळ साधणारे आहे. अर्जप्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा कंपनीचा ९९ टक्क्यांचा विलक्षण दर व त्याला प्रत्येक अर्जापोटी मिळणाऱ्या उच्च महसूलाची मिळणारी जोड या गोष्टी आमच्या ग्राहक-केंद्री तत्वाशी तंतोतंत मेळ साधणाऱ्या आहेत.
सीआयला आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करून घेत आम्ही दीर्घकालीन व्हिसा उपाययोजना पुरविण्याच्या आमच्या क्षमतांमध्ये वाढ करत आहोत आणि सर्व प्रकारच्या व्हिसा व कॉन्स्युलर सेवांची जागतिक स्तरावरील पुरवठादार कंपनी म्हणून आपले स्थान अधिक भक्कम करत आहोत. या संपादनामुळे वाढीला चालना मिळेल, अर्जांची संख्या वाढेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आमचे स्थान अधिक पक्के होईल, याची आम्हाला खात्री आहे.”
या संपादनामुळे बीएलएसच्या पोर्टफोलिओच्या व्हिसा व कॉन्स्युलर सेवा, विशेषत: नागरिकत्व व निवासी सेवांसारख्या दीर्घकालीन व्हिसा उपाययोजनांच्या क्षेत्रातील धोरणात्मक विस्तारावर शिक्कामोर्तब झाले आहे. आपल्या १५ हून अधिक वर्षांच्या कार्यकाळामध्ये सीआयने एका मजबूत ब्रॅण्डची उभारणी केली आहे व उच्च मिळकत असलेल्या व्यक्तींच्या (हाय-नेट-वर्थ इंडिव्हिज्युअल) गटात मोडणाऱ्या आपल्या क्लायन्ट्समध्ये आपली पत निर्माण केली आहे आणि हे करताना नागरिकत्व व निवासी व्हिसा अर्जांसाठी एक विश्वासार्ह नाव म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले आहे. कंपनीच्या या कामाला बीएलएसच्या ६६ देशांमध्ये विस्तारलेल्या व्यापक नेटवर्कचा फायदा मिळणार असल्याने या संपादनामुळे कंपनीकडे प्रक्रियेसाठी येणाऱ्या अर्जांच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.