दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना अक्षय शिंदेने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळी झाडली, यात त्याचा मृत्यू झाला. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

Share.