दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारत भेटीवर आलेल्या फिनलँड संसदेच्या वाणिज्य विषयक समितीच्या सदस्यांनी गुरुवारी (दि. १२) समितीचे अध्यक्ष सकारी पिस्टो यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांचे कुलगुरू देखील उपस्थित होते. फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत एरिक एफ हॉलस्ट्रॉम हे देखील उपस्थित होते.
भारत व फिनलँड आपल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचे ७५ वर्षे साजरे करीत आहेत.
बैठकीत महाराष्ट्र व फिनलँड मधील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्य, विशेषतः विद्यार्थी -, शिक्षक -आदान प्रदान, संशोधन, सामायिक सत्र, कौशल्य विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आदी विषयांवर चर्चा झाली.