दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाजवळ (एमआयडीसी) कारखान्याला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनास्थळावरील व्हिज्युअलमध्ये कारखान्यातून धुराचे प्रचंड लोट उठत असल्याचे दिसून आले. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

Share.