दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

राज्यशासन जनतेच्या कल्याणासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेत आहे. हे निर्णय विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, तसेच महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबत मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांची मुलाखत शुक्रवार दि. 4 आणि शनिवार दि. 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. जेष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Share.