दिनांक –०९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे २६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता १० ते १५ वर्षे या वयोगटासाठी तसेच २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता १६ ते २५ वर्षे या वयोगटासाठी तबला वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी होती. या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून विजेत्यांचे केंद्राच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. पंडित बाळकृष्ण अय्यर, गिरीश गोगटे, हरेकृष्ण रथ यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. छोट्या गटातील विजेते अनुक्रमे – मास्टर कृशांग हरीहरन, स्वरांग दाबके, विहंग मुळ्ये, केशव खटावकर. तर मोठ्या गटातील विजेते अनुक्रमे – निरज कुमार वैष्णव, विवेक संकपाळ, प्रसाद सोनटक्के, प्रथमेश दाते हे आहेत.

Share.