दिनांक –१९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांकडून मानवी साखळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ नाशिक जिल्ह्यातील शेकडो महिलांनी मानवी साखळी केली. सर्जनशिलता व आधुनीक कल्पना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला लोकसंपर्कासाठी मैदानात उतरल्या आहेत.यामध्ये तालुकावार वॉल स्वाक्षरी मोहीम, राष्ट्रवादी हेल्पलाईन व आज मानवी साखळी असे कार्यक्रम राबवला आहे.या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष योगिता आहेर, सायरा शेख, योगिता पाटील, अपर्णा देशमुख, सुरेखा नागरे, राजश्री पहिलवान, सीमा राजोळे, संगिता राऊत, पुष्पलता उदावंत तालुक्याचा पदाधीकारी ने प्रमुख उपस्थिती लावली.
मुंबईनाका ते द्वारका या रस्त्यावर नाशिक जिल्ह्यातील महिलांनी गुलाबी थीम ने मानवी साखळी तयार केली. विविध कल्याणकारी योजनांचे फलक हातात घेऊन “ राष्ट्रवादी दादाचा वादा लाभ आणि बळ,” “राष्ट्रवादीचा वादा-धन्यवाद दादा” अश्या घोशना देत परिसर दणानुन सोडला. याच बरोबर “दादाचा वादा, काम करत आलो काम करत राहू” हे गीत वाजवण्यात आले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतिने गेल्या २ दिवसात राष्ट्रवादी तालुकावार स्वाक्षरी मोहिमेत राबवण्यात आली. यात पांढऱ्या कॅनव्हासवर ज्यावर ‘माझी लाडकी बहिन योजनेला माझा पाठिंबा आहे आणि ती पुढील ५ वर्षे सुरू राहावी अशी माझी इच्छा आहे’ असे टाकून हजारो लोकांनी स्वाक्षरी केली.
या वेळी शितल भोर, भारती खिरारी, सरला गायकवाड, अपर्णा खोत, कल्पना बर्वे, अपेक्षा अहिरे, नलिनी वंजे, रुपाली पठाडे, वृषाली बच्छाव, रोहिणी रोकडे, मंगल मोकळ यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.