दिनांक – २३/०९/२०२५, ठाणे प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- रेल्वेत टीसीच्या नोकरीचं आमिष दाखवून २२ लाखांची फसवणूक; सराईत गुन्हेगार योगेश साळोखे ला ०९/०९/२०२५ रोजी गडहिंग्लज येथून अटक. कल्याण पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरू.
रेल्वेमध्ये सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योगेश हरी साळोखे (वय ३४, रा. हसूर खुर्द, ता. कागल, जि. कोल्हापूर) याला गडहिंग्लज येथून अटक करण्यात आली असून, सध्या त्याच्यावर कल्याण पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यात एकूण अंदाजे २२ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
आरोपीने गडहिंग्लज येथे स्वतःच्या व पत्नीच्या नावावर बंगला खरेदी केला असून, चारचाकी व दुचाकी वाहनं तसेच गावात शेती जमीन देखील घेतली आहे. अशी माहिती मिळाली आहे ही सर्व संपत्ती फसवणुकीच्या पैशातून? जमविल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
🚨 पोलिसांची कारवाई आणि न्यायालयीन निर्णय
या प्रकरणात आरोपीने जिल्हा न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, दोन्ही न्यायालयांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतरही आरोपीने पोलिसांकडे शरण जाण्यास नकार दिला, परिणामी गडहिंग्लज येथील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली.
सध्या आरोपीला न्यायालयिन कोठडी दिली असून, १.८ लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. उर्वरित रक्कम कुठे गुंतवण्यात आली याचा तपास सुरू आहे.
👥 सहआरोपी देखील अटकेत.
या गुन्ह्यात दुसरा सहआरोपी रोहित मारुती मुळीक (वय २९) यालाही कोल्हापूर येथून अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून, त्यांनी अनेक गरीब शेतकरी कुटुंबातील अनेक तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवले आहे.
❗आधीही गंभीर तक्रारी
योगेश साळोखे याच्यावर यापूर्वीही कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये मुलींची छेड काढण्याच्या गंभीर तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पोलीस विभाग या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहत असून, पुढील तपास कल्याण येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
⏭️ पुढील तपास
• फसवणुकीतील संपूर्ण रक्कम व मालमत्तेचा तपशील
• इतर संभाव्य पीडितांची नोंद व साक्ष
• आरोपीच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास पोलीस करत आहे कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तसेच त्यांचे टीमने उत्तम कामगिरी केल्या बद्दल व या टोळीच्या मुस्क्या आवळल्या त्याबद्दल बेरोजगार तरुणांना दिलासा मिळाला आहे व पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल स्थानिक लोकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
संपूर्ण देशात व महाराष्ट्रात विविध राज्यांमध्ये तसेच जिल्ह्यांमध्ये नोकरीचे सरकारी नोकरी चे आमिष दाखवून सर्वसामान्य बेरोजगार तरुणांना फसवणारी एक टोळी सक्रिय झाली आहे. यामुळे पोलिसांसमोर खूप मोठे आव्हान उभे राहिले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पोलीस खात्याकडून देण्यात आलेला आहे.