दिनांक – १७/०८/२०२५, प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- खरच तालुक्याच्या जनतेच्या भल्यासाठी आहे कि स्वतः च्या स्वार्थासाठी प्रताप हरी,वैशू ताई, दिलीप भाऊ वाघ ह्या लोकांचा भाजप प्रवेश.

पाचोरा भडगाव मतदार संघात सध्या भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे कोणालाही प्रवेश नाकारू नका असे राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री आपल्या जिल्ह्याचे माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी नुकतच वक्तव्य केले आहे.

पाचोरा आणि भडगाव मध्ये नुकताच तीन लोकांचा राजकीय प्रवेश झाला आहे एक वैशाली ताई सूर्यवंशी तसेच प्रताप हरी पाटील दिलीप भाऊ वाघ व अगोदरपासून भाजप मध्येच असलेले श्री अमोल भाऊ शिंदे विधानसभेचे दावेदार आहेत.पण बघा ह्या चोघांना भाजपने कसं एका फुल माळ्यात वळण्याचे काम केले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानले जाते त्यामुळेच वैशू ताई यांना भाजप खासदारकीची उमेदवारी देईल का? अशी शक्यता वर्तवली जात आहे व तसेच जर भाजप ने नगरपालिका ताब्यात घ्यायची ठरवली तर नगरपालिका ही दिलीप भाऊ वाघ यांच्या ताब्यात दिली जाईल का? व तसेच अमोल भाऊ शिंदे यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा होईल का ? अशी कदाचित भाजपाची किंवा गिरीश भाऊ ची रणनीती असावी अशी ही शक्यता नाकारता येत नाही प्रताप हरी हे बाजार समिती किंवा जिल्हा परिषद यावर समाधान मानू शकतील यासाठी भाजपकडेही या पदासाठी माणसे नाहीत.

हा सर्व एकूणच प्रकार बघता शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांना हा शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून नेहमीच करण्यात येतो तो आता ही होतोय का? परंतु तालुक्यातील जुने भाजपचे जे काही मुरब्बी चाबी फिरवणारे राजकारणी लोक आहेत ते म्हणजे सुभाष पाटील मधु भाऊ काटे सदाशिव बाबा अजून बरेच जुनी भाजपाचे टीम ही आजही किशोर आप्पा यांना आतून मदत करत असते यात कुठलीही माझ्या मनात शंका नाही

पण जर का? आगामी निवडणुकीत चक्र उलटी फिरली तर या सर्व लोकांचे राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकते का? यावरही विश्लेषण होणे गरजेचे आहे वैशू ताई हे खासदार? म्हणून जातील दिलीप भाऊ नगरपालिका ? प्रताप हरी बाजार समिती? आणि अमोल भाऊ शिंदे आमदारकीला उभे राहतील जर का? विधानसभेला भाजप-सेना युती असली तर युतीचे उमेदवार म्हणून शंभर टक्के हे किशोरआप्पा पाटील हेच उमेदवार असतील यात एक मात्र शंका नाही परंतु मग पुन्हा अमोल भाऊ शिंदे यांच्यावर अपक्ष विधानसभा उमेदवारी करण्याची वेळ येईल का? आणि जर का शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह जर ठाकरे गटाला दिले किंवा सुप्रीम कोर्टाने चिन्ह गोठवले तर किशोर आप्पा पाटील हे भाजपाच्या कमळाच्या निशाणीवर पाचोरा भडगाव विधानसभेचे उमेदवार असू शकतात ? अशी ही शक्यता नाकारता येत नाही एकंदरीतच राजकारणाचा बाजार झाला आहे एकीकडे शरद पवार गट अजित पवार गट तसेच काँग्रेस यांच्याकडे पाचोरा भडगाव तालुक्यात धड धाकट पैसा पात्र विधानसभेला सर्व गुण संपन्न आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवार सध्या तरी समोर दिसत नाहीये.

विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांची काम करण्याची पद्धत कार्यकर्त्यांचा संघटन आणि त्यांची धावपळ बघता सध्यातरी विधानसभेला त्यांचा रथ रोखणं हे स्थानिक नेत्यांकडून शक्य होताना दिसत नाही.

Share.