दिनांक – ०८/०१/२०२६, ठाणे/भिवंडी प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नवतरुणाईला व्यसनाधीन करण्याचे हे काम भिवंडी शहर व ग्रामीण भागात सुरू आहे. स्थानिक पोलीस प्रशासन काय करत आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोनगाव पोलीस स्टेशन,भिवंडी तालुका पोलीस स्टेशन,नारपोली पोलीस स्टेशन,निजामपुरा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात रात्रं-दिवस हुक्का पार्लर सुरू आहेत.नव्याने रुजू झालेले पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य,एक कर्तव्य दक्ष अधिकारी श्री.सदानंद दाते साहेब यांच्यासमोर एक आव्हान उभे राहिले आहे.भिवंडी हे शहरी व ग्रामीण भागात येते.ठाणे शहर पोलीस कमिशनर व ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याहद्दीत सुरू असलेले अवैध हुक्का पार्लर यावर कधी कारवाई करतात.याबाबत एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

रात्रं-दिवस हे हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या पार्लरमध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक हुक्का पिण्यासाठी रात्रभर वावर करत असतात. भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर बाबत गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाचे मुख्य संपादक, मुंबई. वरिष्ठ पत्रकार श्री.अनिल महाजन हे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री. सदानंद दाते साहेब यांची भेट घेणार आहेत. सविस्तर पुरावे देऊन त्याचा पाठपुरावा करून सर्व ऑडिओ-व्हिडिओ क्लिप व नवीन हुक्का पार्लरचे व्हिडिओ यांचा सर्व तपशील पोलीस महासंचालक यांच्यासमोर लवकरच मांडणार आहेत.

गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाची टीम भिवंडी शहर व ग्रामीण भागात सुरू असलेल्या हुक्का पार्लर बाबत लवकरच सविस्तर सर्व पुराव्यांसह कायदेशीर टिकणारा अहवाल तयार करून पोलीस महासंचालक यांच्याकडे सादर करणार आहे. तसेच स्थानिक पोलीस प्रशासन या हक्का पार्लरवर काय कार्यवाही करतात याबाबतही गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाची टीम लक्ष ठेवून असणार आहे.त्याबाबतही अहवालामध्ये नोंद घेणार आहे.

Share.