दिनांक – ०१/१०/२०२५ गर्जा महाराष्ट्र न्यूज :- पाचोरा तालुक्यात शहरात, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामध्ये चार चाकी,दोन चाकी वाहन विना नंबर प्लेट शहरात आणि गावात फिरत आहे. यामध्ये टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल अथवा मोठा ट्रक असेल किंवा तीन चाकी तसेच ट्रॅक्टर अशा विविध प्रकारे वाहनांचा समावेश आहे. राजकीय पक्षाचे बॅनर, सिम्बॉल लावून बिंदासपणे लोक वावरत आहे. यामुळे अनेक गुन्हेगारी टोळीला वाव मिळणार आहे. रात्री-अपरात्री संशयित गाड्या पाचोरा शहरात फिरताना आढळून येत आहे. तसेच दिवसा ढवळ्या अनेक वाहन विना नंबर प्लेटचे पाचोरा शहरात मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहे. पाचोरा पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी आहे का ? पाचोरा पोलीस याकडे कधी लक्ष देतील शहरात दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. ट्राफिकची समस्या मोठ्या प्रमाणात आहे.

सणासुदीच्या दिवसात शहरात सामान्य नागरिकांना चालायला सुद्धा जागा नाही. शेवटी प्रशासन करते काय आहे. अधिकारी फक्त खुर्ची गरम करत आहात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाचोरा शहरात कधी काळी एक शून्य क्राईम रेट असलेले शहर होते. आज पाचोरा शहराचे नाव जळगाव जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीत डोके भर काढत आहे. त्यामुळे पाचोरा पोलिसांसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याची सुरुवात संशयित वाहन राजकीय पक्षाचे बॅनर स्टिकर लावून मोठ्या प्रमाणात फिरताना गावात दिसत आहे. कायदा सुव्यवस्था उरली आहे की नाही. बेकायदेशीर वाहन असेल बिना नंबर प्लेट असेल मग ते कुठल्याही पक्षाचे लोगो किंवा बॅनर असावे त्यावर कारवाई झालीच पाहिजे. पाचोरा पोलीस कधी कारवाई करतील याकडे सामान्य जनतेच्या आता लक्ष लागून राहिले आहे. पाचोरा पोलिसांनी जर तात्काळ बिना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई केली नाही किंवा गाड्या जप्त केल्या नाहीत तर पाचोरा शहरातील सर्व संशयित गाड्यांची व्हिडिओ शूटिंग करून पोलीस महासंचालक तसेच गृहसचिव यांना पुराव्यासह गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून लॅपटॉप मध्ये व्हिडिओ दाखवण्यात येईल व मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये ही सर्क्युलेशन करण्यात येईल त्यामुळे जिल्ह्याचे नाव वरिष्ठ पातळीवर खराब होणार नाही याची काळजी पाचोरा स्थानिक प्रशासन घेणार का ? बे जबाबदार लोकांना आळा घालणार का?

अनिल महाजन.
चेअरमन / मुख्य संपादक :- गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल.

Share.