दिनांक – २३/०१/२०२६,सांगली / शिराळा प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज: कैलास पर्वती आनंद झाला तेजस्वी बालक जन्मासी आला सुखकर्ता दुःखहर्ता म्हणतात त्याला जो बाळा जो जो रे जो…. पाळण्याचे स्वर आणि गणपती बाप्पा चा जयघोष करीत भक्तीमय वातावरणात बांबवडे येथील सुयोग गणेश मंदिराकडून दुसऱ्या वर्षीही गणेश जन्मसोहळा साजरा करण्यात आला. गुरुवारी पहाटे मंदिराचे पुजारी प्रकाश वंडकर महाराज यांनी श्री च्या मूर्तीस अभिषेक घालून विधी करण्यात आला. त्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले केले. दुपारी १२ वाजता गणेश जन्म सोहळा साजरा झाला.
महाआरती करण्यात आली. गणेश जन्म सोहळ्यावेळी मंदिरसमोर रांगोळ्याच्या पायघड्या, गाभाऱ्यात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची व फुग्याची आकर्षक सजावट तसेच मंदिरावर विद्युत रोषणाईने बाप्पाच्या नयनरम्य रूप भाविकांचे लक्ष वेधून घेतले. गणेश जन्मसोहळा भक्तीमय वातावरणात न्हावून निघाला. सकाळपासून गणेश दर्शनासाठी भाविक येत होतो. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार सत्यजित देशमुख, सरपंच भीमराव ताटे, संचालक विश्वास पाटील, चेअरमन सर्जेराव कौचाळे, चंद्रकांत हिंगणे, दिलीप हिंगणे, बाळकृष्ण बनसोडे, संजय शिंदे, विनोद सुतार, बाळकृष्ण रावते, वैभव माने, विजय शेळके, रंगराव सन्मुख, जयसिंग हिंगणे, प्रभाकर खोपडे, आत्माराम हिंगणे, सूर्यकांत मोरे, सचिन बारटपे, तुकाराम बारपटे, अमोल बारपटे, जयवंत हिंगणे, चंद्रकांत माने, संदीप पाटील, नंदा जाधव, शैला मोरे, शुभांगी वंडकर, सुजाता माने उपस्थित होत्या.

