दिनांक – २२/०८/२०२५, मुंबई प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेल व मुंबईचे वरिष्ठ पत्रकार अनिल भाऊ महाजन यांच्या नावाचा काही भामटे गैरवापर करून बनावट नावाने फोन करून सर्वसामान्य नागरिकांना धमक्या देणे व ब्लॅकमेल करण्याचा प्रकार करत आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत.

यासंदर्भात स्पष्ट करण्यात येते की, गर्जा महाराष्ट्र न्यूज हे एक नामांकित व नावलौकिक प्राप्त मीडिया हाऊस आहे. आमच्या चॅनेलचा अशा कुठल्याही अवैध व बेकायदेशीर प्रकाराशी संबंध नाही.

म्हणून, जर कोणी गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या नावाने किंवा अनिल महाजन बोलतोय अस सांगुन बनावट कॉल करत असेल, तर कृपया तात्काळ आमच्याशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

📞 संपर्क क्रमांक: 9967717171

✍️ अनिल बाबुलाल महाजन.
मुख्य संपादक, गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेल, मुंबई

Share.