सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. जाधव यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्याची शेतकऱ्यांची मागणी. दिनांक – ३१/०८/२०२४, पाचोरा प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पाचोरा तालुक्यातील गुढे खेडगाव रस्ता हा अत्यंत रहदारी रस्ता असून या ठिकाणी पाटावर असलेला पूल ठेकेदाराने सहा महिन्यापासून नवीन पूल करण्यासाठी तोडून ठेवलेला आहे. ठेकेदाराने सुरुवातीचे तीन-चार महिने कामाला सुरुवात केली, नाही भर पावसाळ्यामध्ये त्याने काम सुरू केले तेही काम अत्यंत संथ गतीने चालू होते, या ठिकाणी जवळजवळ २०० ते ३०० शेतकऱ्यांचा दैनंदिन वापर आहे, ठेकेदाराने पर्यायी रस्ता म्हणून तीन फुटाचा पाईप टाकून रस्ता बनवलेला होता पण हा रस्ता वाहून गेला.…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक – ३१/०८/२०२४, नाशिक प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज :- नांदगाव येथील शिवसृष्टीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबरच नांदगाव नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नांदगाव, जि. नाशिक येथे आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने प्रादेशिक पर्यटन विकास योजना, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून एक हेक्टर क्षेत्रात शिवसृष्टी प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परिसरात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किशोर दराडे,…
दिनांक – ३०/०८/२०२४, मुंबई प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज :- भारत सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या मंगळवार दि.3 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईत षणमुखानंद हॉल सायन येथे भव्य सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षा तर्फे आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजीत पत्रकार परिषदेत देण्यात आली.या पत्रकार परिषदेस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनावने आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड आणि सरचिटणिस विवेक पवार उपस्थित होते. भारत सरकार मध्ये केंद्रीय राज्यमंत्री पदाची…
दिनांक – २९/०८/२०२४,मुंबई प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज :- तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात घडली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला जोरदार टीका केली आहे. राज्यात कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध होतंय असे ते म्हणाले आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या राज्यातील महिला, मुली, सामान्य नागरिक तर सुरक्षित नव्हताच पण आता राज्यातील शासनाचे अधिकारीही सुरक्षित नाहीत असे दिसते. अशा बातम्या वाचून आपल्या राज्यात “कणा नसलेले सरकार”…
दिनांक – २९/०८/२०२४,मुंबई प्रतिनिधी ,गर्जा महाराष्ट्र न्यूज :- श्री भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण वर्षानिमित्त मांगल्य उजावणी साजरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.सर्व शाळांमध्ये पाचवी ते दहावी या वर्गाकरिता श्री भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित १५ ते २० सप्टेंबर २०२४ या कालावधीकरिता निंबध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. मंत्रालयात श्री भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्माण वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. यावेळी बैठकीला व्यवस्थापन समितीचे सदस्य ललीत गांधी, पवन संघवी, संदीप भंडारी, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे शिक्षण निरीक्षक भक्ती…
दिनांक – २९/०८/२०२४,मुंबई प्रतिनिधी ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ‘म्हाडा’ च्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. म्हाडाच्या मुंबई मंडळ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला दि. १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले. नवीन व मागील सोडतीतील या सदनिका पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून म्हाडाला गृहसाठा म्हणून सदनिका प्राप्त असून अत्यल्प उत्पन्न गटातील…
रायगड : चुलत भावाची हत्या करणाऱ्या आरोपीला माणगाव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. रविंद्र सोनू जगताप असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर घटना तळा तालुक्यातील मजगाव बौद्धवाडी येथे १६ फेब्रुवारी २०१९ ला घडली होती. आरोपी रविंद्र सोनू जगताप आणि त्याचे काका हिरामण जगताप यांच्यात नारळाची झाडे तोडल्यावरून वाद झाला होता. या वादानंतर हिरामण जगताप यांच्या पत्नीने आरोपी रविंद्र जगताप यास शिविगाळी केली होती. याच रागातून आरोपी रविंद्र याने मुंबईहून गावात आलेल्या हिरामण जगताप यांचा मुलगा दिपक याचा चाकू आणि कोयत्याने पोटावर आणि खांद्यावर वार करत हत्या केली. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात आरोपी…
VINESH PHOGAT । करोडों भारतीयांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तिने अंतिम फेरी गाठली होती, पण आता ती पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. याचा स्पष्ट अर्थ विनेश फोगट आज ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भाग घेऊ शकणार नाही. संपूर्ण देशाला विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती आणि ती आज रात्री उशिरा तिचा सुवर्णपदकासाठीचा सामना खेळणार होती, पण आता तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र का ठरवण्यात आले ते जाणून घेऊया… विनेश फोगट हिला ५० किलो वजनी गटात अपात्र ठरवण्यात आले आहे. तिचे वजन १००…
जालना प्रतिनिधी : आरक्षण हा साधा सोपा विषय नाही. तिथे लोकांच्या वेदना आणि आक्रोश आहे. मात्र, महाराष्ट्रात बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. कारण महाराष्ट्र हा आमचा आहे. केवळ नेत्यांचा नाही. हा सगळ्या जातीधर्मांच्या लोकांचा हा महाराष्ट्र आहे. इथे शांतता आहे. काही लोक राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मराठा समाज त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. सरकारने बांगलादेशमधील परिस्थितीवरून सरकारने धडा घ्यावा, असं विधान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केलं आहे. तसेच महाराष्ट्र हा सर्व जातीधर्मांच्या लोकांचा असून बांगलादेशसारखी परिस्थिती आपल्या राज्यात कधीही निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले. ज्यांना गरिबीच्या झळा बसल्या आहेत, ज्यांचा मुलाला एका टक्क्याने…
BSNL 5G : सरकारी कंपनी बीएसएनएल आपल्या किमतींमध्ये फार बदल न करता खासगी कंपन्यांशी स्पर्धा करताना सध्या दिसत आहे. नुकताच बीएसएनएल 5G वरुन पहिला कॉल यशस्वीपणे करण्यात आला असून त्यामुळे बीएसएनएल 5G लाँचिंगच्या तयारीला वेग आल्याचे स्पष्ट आहे. जिओ, एअरटेल, व्हीआय या कंपन्यांनी नुकतीच दरवाढ केली असून याचा फायदा बीएसएनएल झाल्याचे दिसून आले आहे. सर्व कंपन्यांनी आपल्या दरात वाढ केल्यानंतर बीएसएनएलने आपल्या दरात कोणतीच वाढ केली नाही त्यामुळे याचा फायदा बीएसएनएलला झाल्याचे दिसून आले. अनेकांनी आपला नंबर बीएसएसएलवर पोर्ट केल्याचे दिसून आले. बीएसएनएलकडून 5G लाँचच्या तयारीला वेग आला आहे. त्यामुळे लवकरच बीएसएनएल ही 5G मार्केटमध्ये जिओ आणि एअरटेल यांच्याशी स्पर्धा करेल…