दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मानखुर्द येथील वॉर्डच्या १४३ माजी नगरसेविका ऋजुता तारी यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तारी यांच्या पक्ष प्रवेशाने उबाठा गटाला खिंडार पडले असून आतापर्यंत त्यांचे ५५ नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मलबार हिल येथील नंदनवन बंगला येथील कार्यक्रमात पुणे कोंढवा परिसरातील युवा कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरपंच सेवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सक्षम नेतृत्व आणि कल्याणकारी योजनांमुळे जनमाणसांत पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शिवसेनेत राज्यभरातून हजारो कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. मानखुर्दमधील माजी नगरसेविका ऋजुता तारी यांच्यासह उदयनाथ तारी, अशोक…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कृषी विज्ञान संकुलास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी काष्टी ता.मालेगाव येथील कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्री श्री. शिंदे, तसेच कृषीमंत्री श्री.मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मंत्री श्री. भुसे यांच्या विनंतीनुसार सदर कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कृषी विभागास…
दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने एक नवीन प्रकल्प राबविण्यात आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी जे बांधकाम कामगार आहेत त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन नोंदणी करावी लागते. रोजंदारी कामगार असल्याने त्यांचा तो दिवस खाडा पडतो. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ अर्थात सेतू केंद्र स्थापन करण्यात आले आहे. आज राज्यात 358 सेतू केंद्र चालू करावयाचे असून यातील 304 सेतू केंद्राचे आज ऑनलाईन उद्घाटन केले असल्याची माहिती कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली. महाराष्ट्र महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सेतू केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…
दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह राज्याच्या ग्रामीण भागातील ८ देवस्थानांच्या सुमारे २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या विकास आराखड्यांच्या यशस्वी अंमलबजावणीतून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र, देवस्थान विकास शिखर समितीची बैठक आज मंत्रालयात झाली. बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव विकास खारगे, नियोजन…
दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. आज मान्यता दिलेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी जुलै महिन्यात झालेल्या उपसमितीच्या बैठकीत ८० हजार…
दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- One97 Communications Limited (OCL), पेटीएम ब्रँडचे मालक आणि भारतातील अग्रगण्य पेमेंट्स व वित्तीय सेवा कंपनीने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ट्रॅव्हल कार्निवल सेलची घोषणा केली आहे. या विशेष सेलमध्ये ५ ते ९ सप्टेंबर दरम्यान फ्लाइट, ट्रेन आणि बस तिकिटांवर आकर्षक सवलती मिळणार आहेत. हे ऑफर सणासुदीचा प्रवास अधिक परवडणारा आणि सोयीस्कर करण्यासाठी तयार केले गेले आहे. फ्लाइट बुकिंगसाठी, पेटीएमने “FLYAXIS” प्रोमो कोडचा वापर करून Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे बुकिंगवर ₹१,५०० पर्यंत फ्लॅट १२% सूट देण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी “INTLAXIS” कोडद्वारे ₹५,००० पर्यंत १०% सूट मिळू शकते. याशिवाय, आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी क्रेडिट कार्ड EMI…
दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नागरिकांमध्ये सागरी प्रदूषणाविषयी जागृती करणे आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जुहू किनाऱ्यावर दि.२१ सप्टेंबर २०२४ रोजी सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय वने, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, युवा संघटना, राष्ट्रीय छात्र सेना, सागरी सुरक्षा दल सहभागी होणार आहेत. तसेच या दिवशी राज्यातील सागरी किनाऱ्यावरील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा वाढून गुणवंत महाराष्ट्र घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे असणार आहे. यासाठी शासनामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येत असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, शिक्षकांसाठी टप्पा अनुदान लागू करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. डिसेंबर ऐवजी जून महिन्यापासून हा टप्पा लागू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येईल. शिक्षक भरतीला सुरूवात करून पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. ग्रंथपाल, शिक्षण सेवक यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाबाबत सकारात्मक…
दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा दाखविण्यात शिक्षकांचे समर्पण, मार्गदर्शन आणि योगदान महत्त्वाचे असून त्यांच्यामध्ये जग बदलण्याची ताकद असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. महाराष्ट्र विविध क्षेत्रात देशात क्रमांक एकवर आहे. शिक्षण क्षेत्रातही अग्रेसर राहण्यासाठी आपण निर्धार करुया, असे आवाहन त्यांनी केले. सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना आज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एनसीपीए येथील टाटा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे,…
दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही. या लेखाशिर्षात पुरेशी तरतूद उपलब्ध आहे. तथापि जेव्हा तरतूद नसते, तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते. मात्र, पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने ही उणे तरतूद वापरण्याची गरज नाही एवढाच त्या आदेशाचा अर्थ आहे. याबाबतीत स्वयंस्पष्ट आदेश जारी करण्यात आला आहे असे मदत व पुनर्वसन विभागाने आज मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट केले.
