दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस ४ लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस १ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते. इनवेल बोअरिंगसाठी आता ४० हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी ५० हजार रुपये आणि परसबागेकरिता ५ हजार देण्यात येईल. नवीन विहिरींबाबत १२ मीटर खोलींची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच दोन सिंचन विहिरींमधील ५०० फूट अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सोनेसांगवी येथील पिंगला सहकारी सूतगिरणीस शासकीय अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नवीन वस्त्रोद्योग धोरणातील तरतुदीनुसार १५:३५:५० या आकृतीबंधानुसार अटी व शर्तींच्या अधिन राहून हे अर्थसहाय्य देण्यात येईल. आतापर्यंत १४३ सूत गिरण्यांना शासकीय अर्थसहाय्य देण्यात आले आहे.
दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालयासाठी मोर्शी शहरातील जलसंपदा वसाहतीतील ०.६१ हेक्टर आर तसेच ४.०८ हेक्टर आर जागा तसेच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी राष्ट्रीय मत्स्य बीज केंद्र सिंभोरा यांची ३३ हेक्टर एवढी जमीन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांना देण्यात येईल. या महाविद्यालयातील पदांसाठी ३१ कोटी ४८ लाख रुपये खर्च येईल. त्याशिवाय बांधकाम, फर्निचर वाहन खरेदी यासाठी १७१ कोटी ६ लाख खर्च येईल. यापूर्वी मोर्शी तालुक्यातील मौ. पार्डी येथे हे मत्स्य विज्ञान…
दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुणे ते शिरुर हा 53 कि.मी. चा मार्ग सहा पदरी उन्नत करण्यात येणार असून एमएसआयडीसीमार्फत हे काम केले जाईल. यासाठी 7 हजार 515 कोटी खर्च अपेक्षित आहे. शिरुर अहमदनगर बाह्यवळण रस्ता मार्गे छत्रपती संभाजीनगर हा सध्याचा रस्ता सुधारण्यासाठी 2 हजार 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिरुर ते अहमदनगर या मार्गामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत आहे. त्यामुळे ही पथकर वसुली संपल्यानंतर हा मार्ग हस्तांतरित करण्यात येईल. अहमदनगर ते देवगड हा…
दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून प्रवास सुखकारक झाला आहे. मात्र या पुलावरून उडी मारून जीव देण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अटल सेतूवरून आत्महत्या करणाऱ्या महिलेला कॅब चालक आणि पोलिसांनी वाचविल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. आज पुण्याच्या एका बँकरने अटल सेतूवरून समुद्राच्या पाण्यात उडी मारून आपलं जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे अटल सेतू चर्चेत आला आहे. ३५ वर्षीय बँकर अॅलेक्स हा पिंपरीत राहणारा असून कंपनीच्या मिटींसाठी तो मुंबईला गेला होता. मुंबईत राहणाऱ्या सासऱ्याचीही त्याने भेट घेतली होती. तेथून पुण्याला परतत असताना त्याने अटल सेतूवरून…
दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सिंधुदुर्गात मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचं लोकार्पण डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं. पण अवघ्या आठ महिन्यांनी 26 ऑगस्ट 2024 ला शिवरायांचा हा 35 फुटांचा भव्य पुर्णाकृती पुतळा कोसळला होता. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. या घटनेमुळे राज्य सरकारही कोंडीत सापडलं होतं. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची आणि शिवप्रेमींची माफी मागितली होती. तसेच पुतळा कोसळल्याच्या घटना प्रकरणाची सविस्तर तपास करणार असल्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. या प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटे हा घटना घडल्यापासून…
दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पुण्यात जवळपास २०० हून अधिक ढोल-ताशा पथकं आहेत ,ज्यामध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी होतात. पण, आता या ढोल-ताशा पथकांमध्ये तृतीयपंथींच्या ढोल-ताशा पथकाचा समावेश होणार आहे. या पहिल्या तृतीयपंथी ढोल-ताशा पथकाचे नाव शिखंडी असे ठेवण्यात आलं आहे. या पथकाची स्थापना तृतीयपंथी समाज सेविका मनस्वी गोळकर यांनी केली. ट्रान्सजेंडर समाजाकडे भरपूर कौशल्ये आणि कलाकार आहेत, परंतु योग्य संधींच्या अभावामुळे हा समाज अजूनही मागे आहे, पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात हे तृतीयपंथी ढोल-ताशा वादनाचा सराव करतात. शिखंडी ढोल-ताशा पथकातील तृतीयपंथी वादकांना नादब्रह्म पथकाने ढोल-ताशा वादनाचे प्रशिक्षण दिले आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये या पथकाला आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे.…
दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवत संप संस्थगित करण्याची घोषणा केली. राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल , मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे , वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य…
दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या इंडो जर्मन टूल रूम (आय.जी.टी.आर.)(छत्रपती संभाजीनगर) या लघु सूक्ष्म आणि मध्यम मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारत सरकारच्या प्रशिक्षण संस्थेशी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) पुणे या संस्थेने सामंजस्य करार केला आहे. यानुसार उद्योगासाठीच्या तांत्रिक प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार आहे. तसेच याअंतर्गत ७० हजार रुपयांपर्यंतचे तांत्रिक प्रशिक्षण मोफत मिळणार आहे. इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. या योजनेची सविस्तर माहिती www.mahaamrut.org.in किंवा https://www.igtr-aur.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विविध क्षेत्रातील कुशल…
दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सावंतवाडी तालुक्यातील 54 हजार 347 घरांना नळ जोडणी पूर्ण झाली असून 87 गावे ‘ हर घर नल से जल ‘ म्हणून घोषित करण्यात आली आहेत.246 पैकी 203 जलस्त्रोत जिओ टॅगिंग झाले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.पाटील व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संयुक्त बैठकीचे मंत्रालयात आयोजन केले होते. यावेळी बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सहसचिव अमन मित्तल, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या आयुक्त परमित कौर, तालुक्यातील प्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित होते. जलजीवन मिशन अंतर्गत…