दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये एका सजलेल्या राजेशाही पालखीत भरजरी वस्त्रे आणि आभूषणे परिधान केलेली ‘फुलवंती’ दिमाखत बसलेली दिसत आहे. या सौंदर्यवतीच्या मोहमयी रूपाने कोणीही घायाळ होईल. आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती’ च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेल्या फुलवंती सिनेमाचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले आहे. ‘पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची, झगमगत्या रूपाची…. रंभा जणू मी देखणी”…असे म्हणत आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती’च्या रूपामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी सर्वांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. 11 ऑक्टोबरला फुलवंती सिनेमा बॉक्सऑफिसवर…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासी ओबीसी मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत भारताचे संविधान राहील आणि संविधानाने दिलेले आरक्षण राहील.आरक्षण संपविण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही तीव्र निषेध करतो. खबरदार आरक्षण संपविण्याची भाषा कराल तर असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरुद्ध राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येईल. अशी घोषणा…
दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारत भेटीवर आलेल्या फिनलँड संसदेच्या वाणिज्य विषयक समितीच्या सदस्यांनी गुरुवारी (दि. १२) समितीचे अध्यक्ष सकारी पिस्टो यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांचे कुलगुरू देखील उपस्थित होते. फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत एरिक एफ हॉलस्ट्रॉम हे देखील उपस्थित होते. भारत व फिनलँड आपल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचे ७५ वर्षे साजरे करीत आहेत. बैठकीत महाराष्ट्र व फिनलँड मधील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्य, विशेषतः विद्यार्थी -, शिक्षक -आदान प्रदान, संशोधन, सामायिक सत्र, कौशल्य विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता,…
दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी – सकल उत्पन्न दुप्पट होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. तर निती आयोगाने महाराष्ट्राच्या एक लाख कोटी डॉलर्स – वन ट्रिलीयन डॉलर्स ईकॉनॉमीच्या दिशेने टाकलेल्या पावलांना बळ दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुंबई महानगर प्रदेश (एम.एम.आर) ला ‘जागतिक आर्थिक केंद्र’ म्हणून विकसित करण्याबाबत निती आयोगाच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.…
दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरीवली या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच ४७ बी डब्ल्यू ही नोंदणी क्रमांकाची मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी आकर्षक क्रमांक, पसंती क्रमांकासाठी विहीत नमुन्यातील अर्ज १३ सप्टेंबर २०२४ पासून सुरू करण्यात येत असून १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर प्राप्त अर्जांचे शुल्क स्वीकारण्याचे कामकाज सुरू करण्यात येईल. आकर्षक अथवा पसंती क्रमांक घेण्यास इच्छूक असलेल्या अर्जदारास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर क्रमांक देण्यात येणार आहे. मालिका सुरू होण्याच्या दिनांकास सकाळी ११ वाजेपर्यंत एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास आकर्षक क्रमांकासाठी…
दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा मुंबईसाठी गेमचेंजर ठरणारा प्रकल्प आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकारक, जलद, दिलासादायक आणि वेळेची बचत करणारा होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासातील पुढचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या लोकार्पणाप्रसंगी सांगितले. या प्रकल्पामुळे मरिन ड्राईव्ह ते वांद्रे सी लिंक हा प्रवास केवळ 10 मिनिटात पूर्ण होणार असल्यामुळे वेळ, इंधन वाचेल आणि प्रदुषण कमी होऊन मुंबईकरांची कार्यक्षमताही वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी व्यक्त केला. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ…
दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतील निकाकेम कंपनीतून गुरुवारी रात्रीच्या सुमारास गॅस गळती झाली. यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात रासायनिक धूर पसरला होता. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीत धाव घेत पाहणी केली असता एमआयडीसीतील कोणत्याही कंपनीतून गॅस सोडण्यात आला नाही, असं सांगण्यात आलं. शहरात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने अनेक नागरिकांना त्रास झाल्याची माहिती आहे. मात्र, हा धूर कसा पसरला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मात्र, शहरात पसरलेल्या धुरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, निकाकेम केमिकल कंपनीतून केमिकल हवेत पसरल्याने नागरिकांना आरोग्याच्या…
दिनांक –१२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- व्यक्तिमत्व विकासाचे तसेच सृजनशीलता वाढीस लागण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणजे वाचन! वाचनामुळे आनंद मिळतो. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी त्यांना पुस्तकांकडे आकर्षित करावे आणि लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागामार्फत महावाचन उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात 11 सप्टेंबर, 2024 पर्यंत 96,639 (88.95 टक्के) शाळांमधून 12,30,557 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर.विमला यांनी दिली आहे. मोबाईल, टीव्ही, संगणक आदी स्क्रीनच्या वेडामुळे हल्ली मुले वाचनाच्या आनंदापासून दूर जाताना दिसत आहेत. अशावेळी त्यांना पुन्हा पुस्तकांच्या सहवासात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महावाचन उत्सव…
दिनांक –१२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दादरमधील प्रभादेवी सिग्नलजवळील रस्त्याचा काही भाग अचानक खचल्यामुळे तिथे खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्या रस्त्याने जाणारी एक कार अडकली. प्रभादेवी सिग्नलजवळ रस्त्याच्या मधोमध ही घटना घडली. या रस्तावरून जात असलेल्या कारचा टायर अडकला. त्यामुळे येथे अचानक खूपच ट्राफिक वाढली. हा परिसर प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराजवळ असून, येथे गणपती उत्सवानिमित्त मोठी गर्दी होते. मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दिनांक –१२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारताला 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचे उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारत सर्वच क्षेत्रात प्रगतीची झेप घेत आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करीत आहे. देश लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येणार आहे. ‘युएई’ हा भारताचा सर्वात जवळचा मित्र असून या दोन्ही देशातील संबंध फार पूर्वीपासूनचे आहेत. भारताला विकसित राष्ट्र करण्याच्या या विकास यात्रेत यूएईची भूमिका महत्वाची राहणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज केले. हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजित भारत – युएई व्यापार परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात मंत्री श्री. गोयल बोलत…
