दिनांक –१०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नागपूर येथील महत्वाकांक्षी अशा मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य असून मिहान प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावित, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नागपूर येथील मिहान प्रकल्पाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंग, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मिहान प्रकल्पांतर्गत विकसित भूखंडासाठी आकारण्यात येणारे…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –०९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नोकरी जॉबस्पीक इंडेक्स या भारतातील व्हाइट-कॉलर हायरिंग अॅक्टिव्हिटीच्या आघाडीच्या निर्देशांकाने ऑगस्ट २०२३ च्या तुलनेत ऑगस्ट २०२४ मध्ये काहीशा सुधारणेची नोंद केली, जेथे निर्देशांक ३ टक्के घटसह २५७६ पॉइण्ट्सवर पोहोचले. रोजगार बाजारपेठेने महिन्याच्या पूर्वार्धात स्थिर कामगिरी केली असली तरी उत्तरार्धात सुट्टीच्या दिवसांचा एकूण निर्देशांकावर मोठा परिणाम झाला. एकूण घट असताना देखील अनेक क्षेत्रांनी स्थिरता व वाढ दाखवली. एआय-एमएल वार्षिक १४ टक्के वाढीसह अग्रस्थानी होते, ज्यानंतर एफएमसीजी (+११ टक्के), फार्मा/बायोटेक (+९ टक्के), ऑटो (+७ टक्के) आणि ऑईल अँड गॅस/पॉवर (+५ टक्के) यांचा क्रमांक होता. रोजगार बाजारपेठेत काहीसे मंदीचे वातावरण असताना देखील या क्षेत्रांनी उत्तम कामगिरी…
दिनांक –०९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- देशातील प्रमुख स्थानिक इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांपैकी एक असलेली ओबेन इलेक्ट्रिक तिच्या वाढीच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज होत आहे. वर्ल्ड ईव्ही डे निमित्त ओबेन इलेक्ट्रिक पुढील सहा महिन्यांत ४ नवीन इलेक्ट्रिक दुचाकी लाँच करण्याची घोषणा करत आहे, ज्यांच्या किंमती रु. ६०,००० पासून सुरू होऊन रु. १,५०,००० पर्यंत असतील. हा धोरणात्मक निर्णय ब्रँडच्या परवडणाऱ्या, उच्च-प्रदर्शन असलेल्या ईव्ही सोल्यूशन्सच्या बांधिलकीचे प्रतीक आहे, जे विविध ग्राहकांच्या गरजांना लक्षात घेऊन तयार केलेले आहेत. मेक इन इंडिया या उपक्रमाला अनुसरून, ओबेन इलेक्ट्रिक भारताच्या इलेक्ट्रिक गतिशीलता क्षेत्रात नवनवीन समाधानं पुरवून क्रांती घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापक आणि सीईओ,…
दिनांक –०९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे २६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता १० ते १५ वर्षे या वयोगटासाठी तसेच २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता १६ ते २५ वर्षे या वयोगटासाठी तबला वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी होती. या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून विजेत्यांचे केंद्राच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. पंडित बाळकृष्ण अय्यर, गिरीश गोगटे, हरेकृष्ण रथ यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. छोट्या गटातील विजेते अनुक्रमे – मास्टर कृशांग हरीहरन, स्वरांग दाबके, विहंग मुळ्ये, केशव खटावकर. तर मोठ्या गटातील विजेते अनुक्रमे – निरज कुमार वैष्णव, विवेक संकपाळ, प्रसाद सोनटक्के, प्रथमेश…
दिनांक –०९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे आणि MSME टेक्नॉलॉजी सेंटर – इंडो जर्मन टूल रूम (IGTR), अंतर्गत देण्यात येणा-या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी पुढील तुकडीमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या दहावी / बारावी / आयटीआय / डिप्लोमा / डिग्री (इंजीनियरिंग) झालेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी सारथी संस्थेच्या https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच, जाहिरात व प्रवेश प्रक्रियेसाठी IGTR या संस्थेच्या www.igtr-aur.org या…
दिनांक –०९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटींहून अधिक अर्थसहाय्य वितरित करुन तब्बल ४० हजारांहून अधिक गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्याचा विक्रम केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये, या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कक्षाचे काम सुरु आहे. याचाच परिणाम म्हणून मु.वै.स.क. मंत्रालय, मुंबई कार्यालयामधून तब्बल २९२ कोटींपेक्षा अधिक तर मु.वै.स.क.,नागपूर कार्यालय मधून २८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून…
दिनांक –०९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, गणरायाचं आगमन झालंय. आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो, सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना. प्रत्येक गणोशोत्सव एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन…
दिनांक –०९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आपल्या स्थापनेपासून गेल्या ३० वर्षांमध्ये नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने देशाच्या आर्थिक विकासात आणि विकास सर्वसमावेशक करण्यात क्रांतिकारक योगदान दिले आहे. आज नॅशनल स्टॉक एक्सस्चेंज लहान गावापासून मोठ्या शहरातील गुंतवणूकदाराला धनसंपदा निर्मितीमध्ये सहभागी होण्याची संधी देत आहे. विकसित भारताचे लक्ष्य गाठताना नॅशनल स्टॉक एक्स्चेंजसह देशातील वित्तीय संस्थांची भूमिका महत्वाची असेल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी येथे केले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्यालयात राज्यपालांच्या हस्ते वृषभ (बुल) व सामान्य गुंतवणूकदार दर्शवणाऱ्या शिल्पाकृतीचे शुक्रवारी (दि. ६ सप्टेंबर) अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्मितीपासून इतिहास…
दिनांक –०९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ९० च्या दशकात संतोषनगर,शिवसेना शाखेच्याजवळ उल्हासनगर ०४ येथे परिसरातील पटांगणात घरोघरी वर्गणी गोळा करून दहा दिवसाचा सार्वजनिक मंडळाचा गणपती बसवण्याची प्रथा सुरू झाली. सन ८१ ते ८९ सालापर्यंत गणेशोत्सव कालावधीत दरवर्षी नवं-नवीन देखाव्याचे डेकोरेशन असायचे. गणेशोत्सव कालावधीत प्रत्येक घरातून दर दिवशी वेगवेगळा प्रसाद तयार केला जायचा. गुण्यागोविंदाने सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचा गणेशोत्सव साजरा होत होता. दहा दिवसांच्या कालावधीत गणेशोत्सव पटांगणात भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जायचे. तसेच परिसरातील सर्व परिवारांसाठी पडद्यावरील चित्रपटाचेही आयोजन केले जात होते. गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन केलेले असायचे. त्यावेळेस सर्व भाविक सत्यनारायणाच्या पूजेचा अन् प्रसादाचा लाभ घेत…
दिनांक –०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- चीनसोबतचे संबंध सुरळीत करण्यास भारताने तयारी दाखवली असली तरी याबाबत प्रगती होण्यासाठी पुर्व लडाखमधील सीमेशी संबंधीत समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. काही काळापासून, चीनसोबतचे संबंध पूर्ववत करण्यासाठी भारताने तयारी दर्शवली आहे. असे असले तरी अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. जोपर्यंत पूर्व लडाखमधील सीमाप्रश्नाचे अंतिम निराकरण होत नाही तोपर्यंत कोणतीही हालचाल होऊ शकत नाही, अशा प्रकारची भारताची औपचारिक भुमिका वेळोवेळी परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी वारंवार स्पष्ट केली आहे. गेल्या महिन्यात, वित्त मंत्रालयाने वार्षिक आर्थिक सर्वेक्षणात, जागतिक पुरवठा साखळी आणि निर्यातीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी चीनकडून थेट परकीय गुंतवणूक (फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट…