दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत राज्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. खानदेशच्या विकासाची तळमळ असणारा सुपुत्र महाराष्ट्राने गमावला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ‘ज्येष्ठ नेते पाटील यांनी दाजीसाहेब म्हणून आदराचे स्थान मिळवले होते. वडीलांकडून राजकारण, समाजकारणाचा वारसा मिळालेल्या, उच्चशिक्षित अशा ज्येष्ठ नेते पाटील यांची वाटचाल सरपंच ते राज्याचे मंत्री अशी चढत्या आलेखाची राहीली आहे. विधानसभेचे ते दीर्घकाळ सदस्य राहीले होते. या काळात त्यांनी महत्वाच्या विविध खात्यांची जबाबदारी…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्रालयातील परिषद सभागृहात माजी मुख्य सचिव तथा मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सचिव डॉ. विजय सतबीर सिंग, खजिनदार विकास वि. देवधर, कार्यकारी सह सचिव जयराज चौधरी हे उपस्थित होते. अध्यक्ष स्वाधिन क्षत्रिय यांनी संस्थेने सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात केलेल्या ठळक कामांची माहिती दिली. यामध्ये ग्रंथालयातील पुस्तकांची संगणकीय यादी अद्ययावत करण्यात आली आहे. संस्थेचे नवीन सदस्य नोंदणी सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी सार्वजनिक प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी एस एस गडकरी पुरस्कार नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. वातावरणीय बदलांच्या संकटाला तोंड देवून शाश्वत विकास साधण्यासाठी शासनस्तरावर धोरणात्मक पावले उचलण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना उद्युक्त करून जिवाश्म इंधनाला पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स’ देखील गठीत करण्यात आला आहे. राज्यात पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. यासाठी जागतिक…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या शिष्टमंडळाने आज ट्रायडेंट हॉटेल येथे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा विविध अंमलबजावणी यंत्रणांकडून घेतला. यावेळी मुख्य सचिव, तसेच सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांकडून सविस्तर आढावा घेतला. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चा करून त्यांच्या सूचनाही आयोगाने घेतल्या.
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अलिबाग पंचायत समिती येथे स्वच्छता कर्मचारी यांचे आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न झाले. याशिबिरात अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायतींचे 100 स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात सर्व ग्राम पंचायतीमध्ये स्वच्छता ही सेवा अभियान सुरू असून स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या थीम नुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी व त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अलिबाग येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ अनेक स्वच्छता कर्मचारी यांना मिळाला. इतर तपासणी बरोबर डोळ्यांची तपासणी करून सेप्टिक गॉगल्स देण्यात आले.. यावेळी रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील एक अग्रगण्य शक्ती असलेल्या झेलियो ईबाइक्सने आपले बहुप्रतिक्षित नावीन्य, प्रवासाचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाइन केलेली हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, मिस्ट्री लाँच करण्याची घोषणा केली आहे. फक्त ८१,९९९ रुपयांच्या किंमतीत, मिस्ट्री, शाश्वत गतिशीलतेशी अत्याधुनिक कामगिरीची सांगड घालते आणि शहरी व्यावसायिक आणि पर्यावरणाबाबत जागरूक रायडर्स दोघांच्याही गरजा पुरवते. ही स्कूटर, ७२व्ही/२९एएच लिथियम-आयन बॅटरी आणि एक शक्तिशाली ७२व्ही मोटरसह सुसज्ज आहे आणि ती एका चार्जवर १०० कि.मी. ची प्रभावी रेंज आणि ७० कि.मी./तास चा टॉप स्पीड प्रदान करते, ज्यामुळे दररोजच्या प्रवासाच्या गरजांसाठी ती आदर्श स्कूटर बनते. १२० कि.ग्रॅ. चे एकूण वजन आणि १८० कि.ग्रॅ.…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारतीय सैन्यदलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जीकल स्टाईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि.29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्यानुषंगाने रविवार, दि.29 सप्टेंबर 2024 रोजी जंजिरा सैनिकी विश्रामगृह गोधळपाडा, अलिबाग येथे सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या वेळेत जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा, विर माता व वीर पिता यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार असून जिल्हयातील सर्व माजी सैनिक,विधवा, युध्दविधवा, वीरमाता, वीर पिता यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हा प्रशासनाने आंतरजिल्हा सीमा चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय आज आयोजित आंतर जिल्हा बैठकीत घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सीमेलगतच्या जिल्हा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसें, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांसह राज्य…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात एका हल्लेखोर तरूणाने तलवार हातात घेऊन एका तरूणाचा पाठलाग करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. याचा काही व्हिडिओ सोसिअल मीडियावर वायरल झाल्या आहेत. सदर तरूण बिनधास्तपणे हातात तलवार घेऊन वावरत होता. आर्यन पाटील याने एका वाहनाला धडक देऊन वाहनातील प्रवाशांना जखमी केले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. साक्षीदार म्हणून सत्कार भोईर याने आर्यन पाटीलसह त्याच्या इतर साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली होती. सत्कारमुळे आपली नावे पोलिसांना समजली. त्यामुळे पोलिसांनी आपल्याला आरोपी केल्याचा राग आर्यन आणि त्याच्या मित्रांना आला होता.…
दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- एरंडोल-पारोळा मतदार संघात महाराष्ट्र विधान सभेसाठी इच्छुक उमेदवार श्री.अनिल महाजन यांनी आज पारोळा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये यांनी वसंत सहकारी साखर कारखाना कोणामुळे डबघाईला गेला? शेवटचा प्रशासक या साखर कारखान्यावर कोण होतं? हे प्रश्न विचारले आहेत. 25 वर्षात वाघ्या-बर्डी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत? याची देखील त्यांनी विचारणा केली आहे. दरम्यान निल कमल पार्टीकल बोर्ड याची स्थापना करून बोर्डाच्या नावाने शेकडो एकर जमीन पारोळा तालुक्यात म्हसवे गावा लगत बोर्डाच्या नावाने हडप केलीली जमीन कोणाची आहे. हेही विद्यमान आमदारने जनतेला सांगितले पाहिजे.असे ते म्हणाले आहेत. आमदारकीचा…